Porvorim News Update Dainik Gomantak | eSakal.com no.1 Marathi News website In India
गोवा

Khapreshwar Temple: वडाच्या झाडाच्या स्थलांतराला विरोध करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

Khapreshwar Temple Issue: सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पीडब्ल्यूडी अभियंत्याकडून पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल

Akshata Chhatre

पर्वरी: पर्वरीतील श्रीखाप्रेश्वर मंदिराच्या तसेच जुन्या वडाच्या झाडाच्या स्थानांतरामुळे वाद निर्माण झाला आणि खाप्रेश्वर मंदिराचे स्थलांतर होऊ नये म्हणून भाविकांनी या कामाला विरोध दर्शवला होता. या वाढत्या विरोधावरूनच आता झाडाच्या स्थानांतरावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पीडब्ल्यूडी अभियंत्याकडून पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

जमावाविरुद्ध पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार

समोर आलेल्या माहितीनुसार, वडाकडे, सुकूर येथे सुरु असलेल्या स्थलांतराच्या कामात भाविकांकडून अडथळा आणण्यात आला होता आणि म्हणूनच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं, मात्र रविवार (दि. २ मार्च) रोजी रात्री त्यांची सुटका करण्यात आली. सध्या या ठिकाणी भाविकांच्या जमावामुळे कामात अडथळा निर्माण होत असल्याचा दावा करत सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) चे कार्यकारी अभियंता ज्युड ए.डी.कार्व्हालो यांनी जमावाविरुद्ध पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

बांधकामात अडथळा निर्माण करणं हाच उद्देश!

अभियंता ज्युड ए.डी.कार्व्हालो यांनी केलेल्या तक्रारीनुसार, सुकूर येथे बांधकाम कामगार आणि स्थानिक आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झालाय. तक्रारीत त्यांनी २ आणि ३ मार्च रोजी घडलेल्या घटनांचा तपशील दिला आहे, जिथे अज्ञात आंदोलकांचा एक गट वडाकडे, सुकूर येथे विशेषत: सर्वेक्षण क्रमांक ३९३/३ येथे जमला. इथे सुरु असलेल्या कॉरिडॉरच्या बांधकामात अडथळा निर्माण करणं हाच त्या जमावाचा प्रमुख उद्देश होता.

तक्रारीनुसार, आंदोलने वाढली, आंदोलकांनी बांधकाम कामात अडथळा आणला, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप देखील केला आहे. या तक्रारीनंतर पर्वरी पोलिसांकडून पीएसआय सीताराम मलिक या प्रकरणाचा आणखीन तपास करत आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Rate Today: सोनं, चांदी झालं महाग! काय आहेत मुंबई, गोवा, पुणे आणि नागपुरात ताजे भाव? वाचा

'त्यांचे वय झाल्याने त्यांना आदल्या दिवशी काय बोललो, याची आठवण नसावी', वीजदरवाढीच्या गोंधळावरून आपची ढवळीकरांवर टीका

Goa Village Survey: 'मच्छीमार' गावांचे सीमांकन वादग्रस्त! तज्ज्ञांकडून तपासाची मागणी; नकाशांचा शहानिशा अनिवार्य

Goa Agricultural College: अभिमानास्पद! गोवा कृषी महाविद्यालयाला ICAR ची अधिमान्यता, मिळणार राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

Goa Court Verdict: 'मी मैत्रिणीच्या घरी होते'! पीडितेने दिली नाही साथ, अपुरे पुरावे; अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचारप्रकरणी आरोपी निर्दोष

SCROLL FOR NEXT