Khanapur farmers refuse land kalasa banduri project Dainik Gomantak
गोवा

Kalasa Banduri: भरपाई नको, जमीनही देणार नाही! खानापूरातील शेतकऱ्यांचा पवित्रा; 'कळसा-भांडुरा'साठी जमीन देण्यास विरोध

Khanapur Farmers: कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी खानापूर तालुक्यातील असोगा, रुमेवाडी, करंबळ, नेरसासह इतर गावातील शेतकऱ्यांनी जमीन देणे नाकारले आहे.

Sameer Panditrao

पणजी: कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी खानापूर तालुक्यातील असोगा, रुमेवाडी, करंबळ, नेरसासह इतर गावातील शेतकऱ्यांनी जमीन देणे नाकारले आहे. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आज त्या गावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेतकऱ्यांनी आम्हाला भरपाई नको आणि आम्ही जमिनही देणार नाही, अशी भूमिका घेतली.

जमीन संपादीत करण्यासंदर्भात गेल्या फेब्रुवारी महिन्यात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, याबाबत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बागलकोट विभाग भूमी अधिग्रहण अधिकारी श्रीधर गोटूर यांनी आज रूमेवाडी या ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी शेतकऱ्यांनी आम्हाला कितीही पैशाचा मोबदला देत असाल तर तो आम्हाला मान्य नाही आम्हाला आमच्या जमिनी पाहिजे. आमच्या जमिनी तुम्ही ताब्यात घेऊ नका असे सांगून या प्रकल्पाला तीव्र विरोध केला.

कळसा-भांडूरा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी रूमेवाडी गावात भेट देऊन येथील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी आम्हाला कितीही मोबदला दिला तरी आमची जमीन अधिग्रहण करण्यात येऊ नये असे स्पष्टपणे सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले व याबाबतचा अहवाल आपण आमच्या वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल यानंतर पुढील निर्णय होईल असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT