ketan bhatikar Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Council Election : फोंडा पालिकेत सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे दबावतंत्र : केतन भाटीकर

मतदारांची रायझिंगलाच पसंती

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा पालिकेच्या निवडणुकीत सध्या आमिषे आणि धमकी देण्याचे प्रकार सुरू झाले असून सत्ताधाऱ्यांनी कोणत्याही स्थितीत सत्ता आपल्याकडेच रहावी यासाठी दबावतंत्र अंगिकारले आहे. पण फोंडावासीय या दबावाला मुळीच बळी पडणार नाही.

फोंड्याच्या निवडणुकीत प्रामाणिक आणि लोकांची कामे करणाऱ्या रायझिंग फोंडा पॅनेलच्या उमेदवारांनाच निवडून देतील, अशी ग्वाही मगो पक्षाचे फोंड्यातील नेते तथा रायझिंग फोंडा पॅनलचे प्रमुख डॉ. केतन भाटीकर यांनी दिली.

फोंडा निवडणुकीसाठी आपले बारा सदस्यीय पॅनल केतन भाटीकर यांनी यावेळी जाहीर केले. त्यात प्रभाग क्र. 1 साठी नंदकुमार डांगी, प्रभाग क्र. 2 साठी राजेश तळावलीकर, प्रभाग क्र. 3 साठी शेरील डिसोझा, प्रभाग क्र. 5 साठी सुशांत कवळेकर, प्रभाग क्र. 6 साठी मंगेश कुंडईकर, प्रभाग क्र. 8 साठी प्रतीक्षा नाईक, प्रभाग क्र. 9 साठी व्हिन्सेंट पॉल फर्नांडिस, प्रभाग क्र. 10 साठी मनस्वी मामलेदार, प्रभाग क्र. 11 साठी वेदिका वळवईकर, प्रभाग क्रमांक १२ साठी शिवानंद सावंत, प्रभाग क्रमांक 14 साठी अनील ऊर्फ सूरज नाईक तर प्रभाग क्रमांक 15 साठी गिताली तळावलीकर हे उमेदवार रायझिंग फोंडातर्फे निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेस - भाजपची युती...!

केतन भाटीकरचे पॅनल हे बी टीम असल्याचा काहीजणांकडून अपप्रचार केला जात आहे. या प्रचाराला कुणाही बळी पडू नये. सद्यस्थितीत काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही एकमेकांशी संधान बांधलेले आहे आणि दोघांचीही युती झाली आहे, त्यामुळेच आमच्या समर्थक उमेदवारांना पळवण्याचा मागच्या काही दिवसात प्रयत्न झाला, असा आरोपही केतन भाटीकर यांनी केला.

‘रायझिंग फोंडा’कुणाच्याही धमक्यांना भीक घालणार नाही !

पणजीच्या आणि दिल्लीच्या दबावाला रायझिंग फोंडाचे उमेदवार अजिबात बळी पडणार नसून यावेळेला बाराही उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास केतन भाटीकर यांनी व्यक्त केला.

मगोच्या कार्यकर्त्या विद्या पुनाळेकर यांनी भाजपात उडी घेतली, ती दबावाला बळी पडून. रायझिंग फोंडाचे उमेदवार हे शिक्षित आहेत, लोकांची कामे करणारे आहेत, त्यामुळे ते कुणाच्याही धमक्यांना भीक घालणार नाहीत, असे भाटीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT