Bike Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Bike Theft: कागदपत्र आणतो म्हणून पळाले..ते गेलेच! केरळमधून चोरलेली बाईक पोलिसांनी केली जप्त; शिर्ली-धर्मापूरमधील घटना

Bullet Theft Case: संशयावरून मडगाव पोलिसांनी जप्त केलेली केरळ नोंदणीची बुलेट चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही दुचाकी केरळमधील काझिकोड येथून चोरीला गेली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: संशयावरून मडगाव पोलिसांनी जप्त केलेली केरळ नोंदणीची बुलेट चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही दुचाकी केरळमधील काझिकोड येथून चोरीला गेली होती.

या प्रकरणी केरळ पोलिस शनिवारी मडगावात दाखल होऊन संशयित मोहम्मद मुनान (२०) याच्‍यासह दुचाकी ताब्यात घेतली. शुक्रवारी रात्री शिर्ली-धर्मापूर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना चार युवक संशयास्पदरीत्या आढळले होते. त्यांच्याकडे केरळ नोंदणीची बुलेट होती.

दोघांनी कागदपत्र आणतो असे सांगून पळ काढला, तर मोहम्मद व आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एक अल्पवयीन असल्याचे उघड झाले. तपासात बुलेटचा क्रमांक स्कूटरचा असल्याचे तसेच चेसी क्रमांकावरून ती दुचाकी काझिकोड येथून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे केरळ पोलिसांना कळवण्यात आले. अल्पवयीन मुलगा कारवार येथील असून त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती मडगाव पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT