Kiteboarding Dainik Gomantak
गोवा

Kiteboarding Competition: केओना, वरुण, आशिष काईटबोर्डिंगमध्ये विजेते

स्पर्धा मांद्रे येथील जुनसवाडो समुद्रात झाली

गोमन्तक डिजिटल टीम

Kiteboarding Competition भारतीय राष्ट्रीय काईटबोर्डिंग स्पर्धेत केओना रजनी हिने महिलांच्या ट्विन टिप प्रकारात, वरुण नारायणन याने पुरुषांच्या ट्विन टिपमध्ये, तर आशिष राव याने फॉर्म्युला फॉईल प्रकारात विजेतेपद पटकावले. स्पर्धा मांद्रे येथील जुनसवाडो समुद्रात झाली.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी वाऱ्याचा वेग 11 नॉट्स इतका खाली आला होता, त्याचा परिणाम ट्विन टिप प्रकारातील शर्यतींवरही झाला. स्पर्धेच्या कालावधीत मागील दोन दिवस 18 नॉट्स वेगाने वारे वाहत होते.

स्पर्धेत पुरुष गटात अंतिमपूर्व दिनी ॲलेक्झांडर ऑस्टान्निन आघाडीवर होता, मात्र अखेरच्या दिवशी चारपैकी तीन शर्यतीत श्याम राव याने, तर एक शर्यत वरुण नारायणन याने जिंकली.

तीन लढतीत वरुण उपविजेता ठरल्यानंतर सर्वसाधारण क्रमवारीत तो अव्वल ठरला आणि ॲलेक्झांडर तिसऱ्या क्रमांकावर घसरला. श्याम उपविजेता बनला.

फॉर्म्युला काईट प्रकारात आशिष राव याने अखेरच्या तिन्ही शर्यती जिंकून अव्वल स्थान कायम राखले. महिलांत केओना रजनीने निर्विवाद वर्चस्व राखताना सर्व बाराही शर्यती जिंकण्याचा पराक्रम साधला. भारतीय यॉटिंग संघटनेचे अध्यक्ष ॲडमिरल करणबीर सिंग, सचिव कॅप्टन दीक्षित यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT