Goa Crime: वेळसाव हल्ला प्रकरणी सर्व आरोपींना जामीन मंजूर

पोलिसांनी नियमानुसार प्रक्रिया पाळली पाहिजे
court
courtGomantak Digital Team
Published on
Updated on

Goa Crime वेळसाव येथील प्राणघातक हल्ला प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व दहा आरोपींना जामीन मंजूर झाला असून त्याबाबत काँग्रेस नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येत आहेत.

पोलिसांनी नियमानुसार प्रक्रिया पाळली पाहिजे तसेच राजकीय दबावाखाली येऊन काम करू नये अशा शब्दात काँग्रेस नेते ओलेन्सिओ सिमोस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय.

तसेच वेर्णा पोलीस ठाण्याच्या बाहेर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिस कारवाई करण्यात अयशस्वी ठरले असा आरोपही त्यांनी केलाय.

काँग्रेसचे ऑर्विल डौराडो यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी पोलीस निरीक्षक डिएगो ग्रेशियस हे घटनास्थळापासून अवघ्या 5 मीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते.

त्यांच्यासोबत दोन कॉन्स्टेबल आणि एक पोलिस उपनिरीक्षक उपस्थितीत असूनही हा हल्ला झाल्याने आपण सरकारचा निषेध करत असल्याचे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Business Ease Bill Latest News
Pradeep Yadav Bail Rejected
Mallikarjun Kharge Vehicle Attack
Congress Leader Shot Dead
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com