वास्को: केळशी-कुठ्ठाळी येथील मोवाज एंटरप्रायझेसच्या प्रस्तावित तरंगते मनोरंजन मंच, उद्यान आणि रिसॉर्टसाठी गटविकास अधिकाऱ्याने (बीडीओ) जारी केलेल्या तात्पुरत्या ना हरकत प्रमाणपत्राला पंचायत उपसंचालकांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे.
हा प्रस्ताव २०१२ पासून विचाराधीन असून त्याला स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने विरोध होत आहे. या स्थगिती आदेशाचे स्वागत करताना गावकऱ्यांनी याला तात्पुरता दिलासा म्हटले आहे आणि हा प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केळशी - कुठ्ठाळीची १२ रोजी खास ग्रामसभा होऊन मोवाज एंटरप्रायझेसच्या पर्यटन प्रकल्पाला एकमुखी विरोध करण्यात आला होता. या प्रकल्पाला गटविकास अधिकाऱ्याने तात्पुरता ना हरकत दाखला दिला होता. त्याला पंचायत संचालनालयासमोर आव्हान देण्याचा तसेच गरज पडल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा ठराव घेण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित असलेले कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनीही असे प्रकल्प आमच्या गावात नकोच, असे स्पष्ट केले होते.
सदर जमिन कोणी त्या टँकरमालकांना वापरण्यास दिली आहे काय, ती जमिन कोणाच्या मालकीची आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणात दाट झाडी असल्याने व ती निर्जन ठिकाणी असल्याने कोणाच्याही नजरेस येत नाही.या जमिनीला दोन ठिकाणी फाटके आहेत.त्यामुळे ती कोणीतरी त्या टँकरमालकांना वापरण्यास दिली असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वाझ यांनी सांगितले.
सुरवातीपासूनच ग्रामस्थांचा विरोध
केळशी गावातील या प्रस्तावित प्रकल्पाला २०१२ साली परवाना मागण्यात आला होता. तेव्हापासून ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यावेळी केळशीचा समावेश कुठ्ठाळी पंचायतीमध्ये होता. त्यामुळे २०१६ साली परवाना देण्यात आला होता. तथापी, कुठ्ठाळी पंचायतीचे विभाजन होऊन केळशी पंचायत उदयास आल्यावर तो परवाना मागे घेण्यात आला होता.
त्यानंतर कंपनीने पुन्हा नव्याने प्रयत्न करताना परवाना मिळावा यासाठी पंचायत कार्यालयात तक्रार केली होती. याप्रकरणी अलिकडेच गटविकास अधिकाऱ्याने त्या कंपनीला तात्पुरता ना हरकत दाखला दिला होता. यामुळे संतापलेल्या केळशीवासीयांनी खास ग्रामसभा घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.