Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

Pramod Sawant teachers meeting: तीन हजारांपेक्षा अधिक शिक्षिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रविवारी साखळी येथील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.
Pre Primary Teachers Salary Hike
Pre Primary Teachers Salary HikeDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: गोव्यातील ८०० हून अधिक पूर्वप्राथमिक शाळांमध्ये गेली अनेक वर्षे अल्प वेतनावर सेवा बजावणाऱ्या तीन हजारांपेक्षा अधिक शिक्षिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रविवारी साखळी येथील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी ऑक्टोबर महिन्यात हा विषय मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.

गेल्या सुमारे २० वर्षांपासून पूर्वप्राथमिक स्तरावर कार्यरत असूनही पगारवाढ आणि सेवाविषयक लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. पूर्वप्राथमिक शिक्षण हे बालकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे.

Pre Primary Teachers Salary Hike
Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

या स्तरावर मुलांच्या मूलभूत अध्ययन कौशल्यांसोबतच भावनिक, सामाजिक आणि मानसिक विकासाला दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षिकांवर असते. मात्र, शिक्षण व्यवस्थेत एवढी महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही अनेक पूर्वप्राथमिक शिक्षिकांना अद्याप नियमित सेवाशर्ती लागू झालेल्या नाहीत. अनेकजणी तात्पुरत्या किंवा कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये बालपणातील शिक्षणाला औपचारिक शिक्षणव्यवस्थेतील पायाभूत स्तर म्हणून महत्त्व देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वप्राथमिक स्तरावर कार्यरत शिक्षकांना आवश्यक पात्रता, सुविधा आणि योग्य सेवाशर्ती उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे शिक्षिकांनी सांगितले.

Pre Primary Teachers Salary Hike
Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

पात्रतेनुसार वेतन!

राज्यातील सर्व पूर्वप्राथमिक शिक्षकांच्या सेवा नियमित कराव्यात, नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आणि आवश्यक पात्रता लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतन व सेवाविषयक लाभ द्यावेत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पूर्वप्राथमिक शिक्षिकांसाठी निश्चित वेतनश्रेणी, नोकरीची सुरक्षितता, प्रोत्साहन आणि सन्मानजनक सेवाशर्ती लागू कराव्यात, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com