Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Delhi Excise Policy case: दिल्ली अबकारी मद्य धोरणातील कथित घोटळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Delhi Excise Policy case

दिल्ली अबकारी मद्य धोरणातील कथित घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. घोटाळ्यातील पैसा गोवा विधानसभेच्या निवडणूक प्रचारात देखील वापर केल्याचा आरोप केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर आहे.

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणूक काळात केजरीवाल यांचा येथील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम होता, तसेच या हॉटेलचे बिल प्रचारासाठी रोख पैसे घेतलेल्या व्यक्तीने दिल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

अरविंद केजरीवाल 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान सेव्हन स्टार ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुक्कामाला होते, याचे बिल चनप्रीत सिंग यांनी दिले. चनप्रीत सिंग यांनी आम आदमीच्या प्रचारासाठी रोख निधी स्वीकारला होता, अशीही माहिती अंमलबजावणी संचालनालय (ED) ने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

तसेच, हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित नसून, आम्ही राजकारणाशी संबंधित नाही. आमचा केवळ पुराव्यांशी संबंध असून, ते आमच्याकडे आहेत, अशी माहिती ईडीतर्फे उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी न्यायालयात दिली.

प्रकरणाचा तपास सुरु केला त्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यावर फोकस नव्हता पण, जसजसा तपास पुढे सरकत गेला त्यावेळी त्यांची (केजरीवा यांची) यातील भूमिका स्पष्ट होत गेली, असेही ईडीने कोर्टात सांगितले आहे.

दरम्यान, दिल्ली अबकारी मद्य धोरणातील कथित घोटळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेत आहेत.

गोव्यात विधासभा निवडणूक प्रचारासाठी कोट्यवधी पैसे हस्तांतरीत केल्याचा आरोप आम आदमी पक्षावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Price: नारळ महागला! स्थानिक उत्पादन कमी, परराज्यातून आवक; शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी

Goa Crime: गूढ उकलले! कुंकळ्ळीच्या बेपत्ता मुली नाशिकमध्ये सापडल्या; नेमकं काय घडलं वाचा

Goa Dairy Payment: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांची रक्कम 30 जुलैपर्यंत देणार! 12 कोटींची तरतूद; सहकारमंत्री शिरोडकर

Xi Jinping: जिनपिंग यांचे 'अध्यक्षपद' जाणार? विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वबदलाची चीनमध्ये रंगली चर्चा

Usgao: विनापरवाना बांधली भिंत, उसगावात वाढला पुराचा धोका; पंचायतीने बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT