Goa Politics  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: केजरीवाल आणि चिदंबरम यांचा ट्विटवॉर..

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या ट्विटची खिल्ली उडवली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Election 2022: राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी उलथापालथ होत आहे. काँग्रेसच्या 17 पैकी 15 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या ट्विटची खिल्ली उडवली आहे. निवडणुकीवरून दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटरवरच खडाजंगी सुरू आहे. (Kejriwal and Chidambaram's tweet war for goa assembly election)

चिदंबरम यांनी काय ट्विट केले होते

वास्तविक, पी चिदंबरम (P.Chidambaram) यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात (Goa Assembly Election) एक ट्विट केले होते. त्यांनी लिहिले की आम आदमी पार्टी आणि टीएमसी यांना गोव्यातील केवळ भाजप विरोधी मत मिळतील,असे माझे आकलन आहे. याला अरविंद केजरीवाल यांनी दुजोरा देत, त्यांनी पुढे लिहिले की, गोव्यात काँग्रेस (Goa Congress) आणि भाजपमध्ये लढत आहे.

केजरीवाल यांनी घेतला चिमटा

या ट्विटनंतर काही वेळातच आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पी चिदंबरम यांच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले - सर, रडणे बंद करा - 'हाय रे, मार गये रे, हमारे मत काटा दी रे' अश्या स्वरूपाचे ट्विट करत ते पुढे म्हणाले, गोवा फक्त तिथेच मतदान करेल जिथे त्यांना आशा दिसेल.

"केजरीवाल यांनी काँग्रेस हमी नावाची चिठ्ठीही लिहिली आहे. त्यांनी लिहिले की, काँग्रेसचे प्रत्येक मत भाजपला सुरक्षितपणे पोहोचवले जाईल. भाजपला मत देण्यासाठी काँग्रेसशी संपर्क साधा, ते सुरक्षितपणे पोहोचतील".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT