Ponda Kaziwada Dainik Gomantak
गोवा

Ponda: 40 वर्षांपूर्वीचे बेकायदा गाडे हटवले, फोंडा नगरपालिकेची धडक कारवाई; विक्रेत्‍यांची उडाली धांदल

Ponda Kaziwada: गाडे हटवण्याच्या या कामाला विरोध करण्यासाठी गाडेवाले जिल्हा न्यायालयात गेले होते, पण न्यायालयाने गाडे हटवण्याच्या कामाला ‘स्टे’ दिला नाही असेही पालिका अभियंत्याने स्पष्ट केले.

Sameer Panditrao

फोंडा: येथील बेकायदा गाडे हटवण्याच्या कामाला फोंडा नगरपालिकेने अचानक सुरवात केल्यामुळे मालकांची धांदल उडाली. काझीवाडा-फोंडा भागातील रस्त्याच्या कडेला असलेले एकूण आठ गाडे पालिकेने शनिवारी हटविले. मात्र चाळीस वर्षांपूर्वीच्या या आठही गाडेवाल्यांना पालिकेने अन्यत्र कुठेही जागा दिली नसल्याने सध्या त्‍यांच्‍या रोजीरोटीचा मोठा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे.

दरम्‍यान, पुनर्वसनासाठी आम्ही तयार आहोत, पण गाडेवालेच तयार नसल्याचे पालिका अभियंत्याने स्पष्ट केले. सारस्वत बँकेसमोर असलेले हे आठही गाडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आले आहेत.

गाडे हटवण्याच्या या कामाला विरोध करण्यासाठी गाडेवाले जिल्हा न्यायालयात गेले होते, पण न्यायालयाने गाडे हटवण्याच्या कामाला ‘स्टे’ दिला नाही असेही पालिका अभियंत्याने स्पष्ट केले.

दरम्‍यान, गेली अनेक वर्षे आम्‍ही या गाड्यांवरच रोजीरोटी चालवत होतो. पण आता गाडे हटवल्यामुळे आमची रोजीरोटी हिरावली गेली आहे. आता निदान पोलिस स्थानकाच्या मागच्या बाजूला मोकळया जागी तरी गाडे थाटण्यास आम्‍हाला परवानगी द्यावी, अशी मागणी गाडेवाल्यांनी केली आहे. तसेच हा प्रश्‍‍न कायमस्‍वरूपी सोडवावा, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

दुकाने दाखवली, पण गळकी!

फोंडा पालिकेने गाडेवाल्यांच्या पुनर्वसनासाठी बसस्थानकावरील इंदिरा मार्केटमधील दुकाने दाखवली. मात्र ती गळकी असल्याचे दुकानवाल्यांचे प्रतिनिधी ॲड. सुरेल तिळवे यांनी सांगितले. दरम्यान, कुणाच्या तरी हितासाठी गाडे हटवण्यात आल्याचा आरोप डॉ. केतन भाटीकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT