Ponda: बेकायदा भंगारअड्डे हटवा! किर्लपाल-दाभाळ ग्रामसभेत मागणी; विद्यार्थ्यांना होतोय प्रदूषणाचा त्रास

Kirlpal Dabhal: सरपंच दामोदर बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली वागोण येथील श्री सातेरी देवस्थानच्या सभामंडपात ही ग्रामसभा घेण्यात आली.
Kirlpal Dabhal Scrapyards
Kirlpal DabhalDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: किर्लपाल दाभाळ पंचायतची ग्रामसभा अनेक मुद्ध्यावरुन गाजली. विशेष म्हणजे, सावरगाळ येथे शाळेजवळील बेकायदा भंगार अड्ड्यावर कारवाई करून तो अड्डा त्वरीत हटवा, अशी मागणी नागरिकांनी केली.

सरपंच दामोदर बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली वागोण येथील श्री सातेरी देवस्थानच्या सभामंडपात ही ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंच कालिदास गावकर, पंच सदस्य रमाकांत गावकर, बारकेलो ऊर्फ भोला गावकर,भानुदास गावकर, राजेंद्र वेळीप उपस्थित होते.

सोमनाथ हायस्कूलला लागूनच असलेल्या भंगार अड्यामुळे विद्यार्थ्यांना प्रदूषणाचा त्रास होतो. येथे रासायनिक पदार्थ तसेच विविध द्रव्य साठवले असतात.

पावसाळ्यात ते पाण्यात मिसळून नदी, नाल्यात वाहून जाऊन त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असे ग्रामस्थांनी ग्रामसभेत सांगितले.

किर्लपाल दाभाळ पंचायत नव्याने बांधण्यात येत असून या पंचायत इमारतीचे काम नियोजित आराखड्याप्रमाणे होत नाही. या कामाची चौकशी होऊन ते काम लवकर व्हायला हवे. पंचायत क्षेत्रातील काही जागांवर उघड्यावर कचरा फेकला जातो. अशा जागांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कचरा फेकणाऱ्यावर कारवाई करावी, अशा मागण्या रविवारी झालेल्या किर्लपाल दाभाळ पंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली.

Kirlpal Dabhal Scrapyards
Dhavali Scrapyard Fire : अद्याप आग धुमसतेय; झोपडीवजा घरे खाक झाल्याने चार कुटुंबे वाऱ्यावर

वीजपुरवठ्याची समस्या

या भागात अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो. त्याचा परिणाम स्थानिकांच्या घरातील विजेवर चालणाऱ्या वस्तूवर परिणाम होत आहे. या भागत कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या जाणवते. त्यामुळे अनेक उपकरणे खराब झाली आहेत.

याचा आर्थिक फटका ग्रामस्थांना बसत आहे, याकडे ग्रामस्थांनी ग्रामसभेत लक्ष वेधले व याची योग्य दखल पंचायतने घ्यावी तसेच गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

Kirlpal Dabhal Scrapyards
Dhavalim Scrapyard Fire: भंगारअड्ड्याला लागलेल्या आगीमागील कारण शोधण्याची मागणी; कोट्यवधींमध्ये नुकसान

पंचायत सचिव वेळवर हजर नसतो

पंचायत कार्यालयात सचिव वेळेवर उपलब्ध होत नाही. दोन पंचायतींचा ताबा असल्याचे सांगून ते गैरहजर राहतात. लोकांची कामे खोळंबून राहतात. त्यामुळे पूर्णवेळ सचिवाची नेमणूक करावी, त्यासाठी पंचायत मंडळाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी झाली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रताप सावंत देसाई, डॉ. सचिन तेंडुलकर, ॲड. विकास देसाई, संजय देसाई, मोहन देसाई, मोहन गावकर, जयेश पाटील, ॲड. ईश्वर कुट्टीकर, नीलेश नाईक व अन्य ग्रामस्थांनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com