Kasaarvarne School Vandalism Dainik Gomantak
गोवा

Kasaarvarne School Vandalism: कासारवर्णेच्या शाळेत तोडफोड; खिडक्यांच्या काचा फोडल्या, नळाची जोडणीही तोडली, पोलिसांत तक्रार

Kasaarvarne school vandalism latest news: कासारवर्णे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यासह नळाची जोडणी तोडल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: कासारवर्णे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यासह नळाची जोडणी तोडल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकाराची माहिती मिळताच पेडणे शिक्षण अधिकारी अलिशा यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध मोपा पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

शाळेच्या इमारतीजवळ टाकून दिलेल्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून, त्याच बाटल्या खिडक्यांच्या काचांवर फेकून मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शाळेची नळाची जोडणीही तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कासारवर्णेच्या सरपंच सोनम परब, पंचायत सदस्या अवनी गाड व वृषाली नाईक, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष पांडुरंग नाईक, गोवा प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. जितेंद्र गावकर, समाजसेवक उदय महाले, प्रकाश किनळेकर आणि रमाकांत तुळसकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या प्रकाराचा निषेध केला.

दरम्यान, शाळेच्या परिसरात वारंवार अशा घटना घडू नयेत, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच शाळेच्या सुरक्षेसाठी पहारेकरी नियुक्त करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

लोबोंच्या तक्रारीनंतर दोघांना अटकपूर्व जामीन; ग्लेन, डेरिक यांना न्यायालयाचा दिलासा

Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

SCROLL FOR NEXT