टेक जगताला हादरवणारा सायबर हल्ला! Zoom, CNN आणि BBC सह 170 हून अधिक वेबसाईट्सना मालवेअरचा तडाखा; कोट्यवधी युजर्सचा डेटा धोक्यात

Global Cyber Attack On Major Brands Websites: जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या वेबसाईट्सवरुन युजर्सच्या डेटा आणि आर्थिक व्यवहारांवर डल्ला मारणारा एक मोठा सायबर हल्ला नुकताच उघडकीस आला.
Global Cyber Attack On Major Brands Websites
Global Cyber Attack On Major Brands WebsitesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Global Cyber Attack On Major Brands Websites: जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या वेबसाईट्सवरुन युजर्सच्या डेटा आणि आर्थिक व्यवहारांवर डल्ला मारणारा एक मोठा सायबर हल्ला नुकताच उघडकीस आला. झूम, बीबीसी, सीएनएन, एचएसबीसी, इक्विफॅक्स, आयकिया आणि सेल्सफोर्स यांसह जगभरातील 170 हून अधिक नामांकित ब्रँड्सच्या वेबसाईट्सवर सोमवारी (16 नोव्हेंबर) घातक मालवेअर आणि मॅलिशियस जावास्क्रिप्ट कोड आढळून आल्याने इंटरनेट जगतात मोठी खळबळ उडाली.

'रिपोर्ट यूआरआय'ने दिलेल्या माहितीनुसार, 'ऑप्टिमाइझली' या एआय-आधारित वेब एक्सपेरिमेंटेशन प्लॅटफॉर्ममधील त्रुटीचा गैरफायदा घेत सायबर हल्लेखोरांनी हा प्रकार घडवून आणला. या हल्ल्याची व्याप्ती अत्यंत गंभीर असून 178 संस्थांच्या ग्राहकांना याचा फटका बसला.

Global Cyber Attack On Major Brands Websites
Cyber Attack: Apple यूजर्स सावधान! iPhone, iPad आणि MacBook वर सायबर हल्ल्याचा धोका; हॅकर्सपासून वाचण्यासाठी तातडीने करा 'हे' काम

या तांत्रिक घुसखोरीद्वारे सायबर चोरट्यांनी संबंधित कंपन्यांच्या मूळ कोडिंगला हात न लावता थेट युजर्सच्या ब्राउझरमध्ये घातक स्क्रिप्ट पाठवल्या. या स्क्रिप्ट्सच्या माध्यमातून ग्राहकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड नंबर चोरणे, स्क्रीनशॉट घेणे आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारांदरम्यान ग्राहकांच्या वॉलेट ॲड्रेसऐवजी स्वतःचा वॉलेट ॲड्रेस टाकून पैसे वळवण्याचे प्रकार घडले.

Global Cyber Attack On Major Brands Websites
Cyber Attack: ब्रिटन, अमेरिकाही वाचू शकले नाहीत! सायबर हल्ल्यामुळे अनेक गुपिते उघड होण्याची भीती

प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी अवघ्या नऊ तासांच्या आत हल्लेखोरांच्या क्रिप्टो वॉलेटमध्ये सुमारे 7,040 डॉलर्स इतकी रक्कम जमा झाल्याचे समोर आले. या घटनेची गंभीर दखल घेत ऑप्टिमाइझली कंपनीने एका सुरक्षा त्रुटीमुळे हा प्रकार घडल्याची कबुली दिली असून, संबंधित मार्ग तातडीने बंद करुन आवश्यक सुधारणा लागू केल्याचे स्पष्ट केले. तसेच, बाधित ग्राहकांना याबाबत सतर्क करण्यात आले असून, या सायबर हल्ल्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.