Karvy Flowers|Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat: निळ्या-जांभळ्या फुलांचा अलौकिक सोहळा! चोर्ला घाटात सात वर्षांनी बहरणाऱ्या कारवीचा पुष्पोत्सव

Karvi Flowers: स्ट्रोबीलेन्थस केंलोसस या नावाची ही कारवीची प्रजाती दर सात वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सह्याद्रीच्या पर्वत रांगात आणि त्यांच्या संलग्न प्रदेशात फुलायला लागते

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Chorla Ghat Karvi Flower Purple

खांडोळा: चोर्ला घाट म्हणजे निसर्गसंपन्न परिसर. गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात सात वर्षांनंतर फुलणाऱ्या कारवीच्या निळ्या-जांभळ्या फुलांचा आविष्कार पाहायला मिळत आहे. चोर्ला परिसरात पुष्पोत्सवाचा अलौकिक सोहळा सुरू आहे. यंदा फुललेल्या कारवीच्या फुलाचे दर्शन प्रवासी रस्त्यावर थांबून घेत आहेत.

या कारवीचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तिचा एकत्रित बहर, सृष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा चोर्लात सुरू आहे. सात वर्षे काहीच नसते आणि अचानक फुले येतात. जांभळ्या रंगाची टपोरी फुले लेऊन जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात, तेव्हा डोंगर उतारांना त्या रंगाच्या छटा प्राप्त होतात. या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्‍या या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच डेरा देऊन बसतात, हे दृश्‍य चोर्लाघाटात सुरू आहे.

स्ट्रोबीलेन्थस केंलोसस (Strobilanthes Callosa) या नावाने वनस्पती शास्त्रात परिचित असणारी ही कारवीची प्रजाती, दर सात वर्षांच्या प्रदीर्घ अशा कालखंडानंतर जेव्हा सह्याद्रीच्या पर्वत रांगात आणि त्यांच्या संलग्न प्रदेशात फुलायला लागते. तेव्हा कृमीकीटकांच्या विविध प्रजाती आणि रंगीबेरंगी फुलपाखरांचे थवे स्वच्छंदपणे निळ्या - जांभळ्या फुलात दडलेल्या मधुरसाचा आस्वाद घेण्यासाठी भिरभिरत आहेत. पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने या घाट रस्त्यांवर निरीक्षण करीत आहेत.

औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती!

कारवीच्या आश्रयाला वाढणारे अनेक कीटक जंगलातील इतर वृक्षांच्या परागीभवना/ परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असल्यामुळे कारवी जंगल संवर्धनास अप्रत्यक्षरीत्या का होईना; पण मोलाचा हातभार लावते. बहर ओसरला, की कारवीची बोंडे सुकू लागतात. या बोंडांवर तरळणारा चिकट तरल द्रव चाखायला गुरांना आवडते. सह्याद्री घाटात ही वनस्पती भरपूर दिसून येते. गेल्या वर्षी शिगाव, कणकुंबी- बेटणे, फुलली होती. खोडाची साल वेदनाहारक असून, मुरड्यावर शेकण्यास व लाळ-ग्रंथीच्या दाहयुक्त सुजेवर बाहेरून लावण्यास उपयुक्त असते.फुलांनी जखम भरून येते. पाने जनावरांना चारतात. झाडे वरचेवर छाटून त्यानंतर आलेल्या बारीक फांद्या छप्पर व कुडाच्या भिंतीसाठी वापरतात.

बहुपयोगी कारवी

कारवीच्या उंचच उंच सरळसोट वाढणाऱ्या काड्यांचा वापर कुडाचे घर बांधण्यासाठी करतात. एवढेच काय तर कारवीच्या मुळांवर काही परजीवी वनस्पतीदेखील वाढतात.अशा या बहुपयोगी कारवीचा दर सात -आठ वर्षांनी सह्याद्रीत फुलणारा असा हा आगळावेगळा पुष्पोत्सव मन भरून पाहाता येते. बेळगाव- गोवा ये-जा करणाऱ्यांना प्रवाशांसाठी आणखी आठ दिवस हा पुष्पोत्सव पाहता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT