Pramod Yadav
गोव्यात सात वर्षातून एकदाच फुलणाऱ्या कारवीची फुले खूप प्रसिद्ध आहेत.
राज्यातील धारबांदोडा तालुक्यातल्या दूधसागर नदी किनारी वसलेल्या शिगावात कारवीची फुले पाहायला मिळतात.
कारवीला विज्ञानाच्या भाषेत स्ट्रोबीलेन्थस केंलोसस या नावाने ओळखले जाते.
सात वर्षातून एकदाच बहरणाऱ्या या फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक स्थानिक आणि पर्यटक देखील आतूर असतात.
निळ्या - जांभळ्या रंगाची ही कारवीची फुलांमधून मधूर रस शोषण्यासाठी मधमाशा हजेरी लावतात.
विशेषत: भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या काळात या फुलांना बहर येतो.
गेल्या वर्षी (2023) मध्ये कारवीच्या फुलांना बहर आला होता त्यानंतर आता सात वर्षांनी 2030 मध्ये ही फुले बहरतील.