Sancoale Shree Vijayadurga idol And chapel  Dainik Gomantak
गोवा

सांकवाळ येथे चॅपेलसमोर श्रीविजयादूर्गा देवीची स्थापना, 500 वर्षानंतर मूळजागी स्थापना केल्याचा करणी सेनेचे दावा

Pramod Yadav

Sancoale Shree Vijayadurga Idol And Chapel: सांकवाळ येथील चॅपेलसमोर श्रीविजयादूर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे. करणी सेनेच्या वतीने देवीची स्थापना करण्यात आली असून, 500 वर्षानंतर देवी मूळजागी विराजमान झाल्याचा दावा सेनेने केला आहे.

देवीची स्थापना करण्यात आली आहे. सर्व हिंदू भक्तांनी येऊन दर्शन घ्यावे असे आवाहन करणी सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सुभाष वेलिंगकर यांनी याबाबत करणी सेनेचे अभिनंदन केले आहे. "चला! भक्तांच्या चिकाटीने शेवटी श्रीशंखवाळ तीर्थक्षेत्रातील मूळ स्थानी, " पुरातत्व खात्याने वारसास्थळ म्हणून संरक्षित केलेल्या, " फ्रंटिसपीस " भूखंडातच श्रीविजयादूर्गा देवीची स्थापना करण्यात आली. ही जागा हडपण्यासाठी चर्च संस्थेने बेकायदेशीरपणे उभारलेले चॅपेल!" असे ट्विट करत, वेलिंगकर यांनी भक्तगणांचे अभिनंदन केले आहे.

"अभिनंदन! ५०० वर्षांनंतर श्रीक्षेत्रशंखावलीची श्रीविजयादूर्गा आपल्या मूळस्थानी स्थापन झाली! आज तिच्या दर्शनाला चला!" असेही सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, श्रीक्षेत्रशंखावलीची श्रीविजयादूर्गा पूर्वीपासून येथेच असल्याची दावा हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT