Sancoale Shree Vijayadurga idol And chapel  Dainik Gomantak
गोवा

Sancoale Chapel: सांकवाळ येथे चॅपेलसमोर श्रीविजयादूर्गा देवीची स्थापना करणाऱ्यांवर गुन्हा नोंद

आठ अज्ञातांसह दहा जणांविरोधात वेर्णा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

FIR Register Against Those Installing Shree Vijayadurga Idol At Sancoale: करणी सेनेच्या वतीने सांकवाळ येथील चॅपेलसमोर श्रीविजयादूर्गा देवीची स्थापना करण्यात आली होती. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच उपअधीक्षक शेख, राणे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस तेथे आले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

देवीची स्थापना केल्याने चर्चचे फादर व ग्रामस्थांनी संबंधितांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.

दरम्यान देवीची स्थापना करणाऱ्या आठ अज्ञातांसह दहा जणांविरोधात वेर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच स्थापन केलेली मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतली असून बांधकाम हटविले. 

पुरातत्व खात्याचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थला पाहणी केली. पुरातत्व खात्याकडून अहवाल मिळाल्यावर पुढील कारवाई होणार आहे. 

सांकवाळ येथील चॅपेलसमोर श्रीविजयादूर्गा देवीची स्थापना करण्यात आली होती. देवीची स्थापना करण्यात आली आहे. सर्व हिंदू भक्तांनी येऊन दर्शन घ्यावे असे आवाहन करणी सेनेच्या वतीने करण्यात आले होते.

यावर सुभाष वेलिंगकर यांनी करणी सेनेचे अभिनंदन केले होते. श्रीक्षेत्रशंखावलीची श्रीविजयादूर्गा पूर्वीपासून येथेच असल्याची दावा हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT