Karnataka Tourist Death Case Dainik Gomantak
गोवा

Karnataka Tourist Death Case: मी झोपेच्या गोळ्या संदीपला दिल्या हे खरं, पण..., अक्षताची पोलिसांसमोर स्पष्ट कबुली, खुनाचा गुन्हा नोंद

Karnataka Tourist Death Case Update: ‘उडुपी येथील संदीप सलायम यांना मी झोपेच्या गोळ्या दिल्या हे खरे आहे, पण त्या चुकून दिल्या. त्या गोळ्या मी स्वतःसाठी आणल्या होत्या’, अशी कबुली संशयित अक्षता एम.के. हिने पोलिसांसमोर दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: ‘उडुपी येथील संदीप सलायम यांना मी झोपेच्या गोळ्या दिल्या हे खरे आहे, पण त्या चुकून दिल्या. त्या गोळ्या मी स्वतःसाठी आणल्या होत्या’, अशी कबुली संशयित अक्षता एम.के. हिने पोलिसांसमोर दिली आहे. संदीप यांच्या मृत्युप्रकरणी अक्षतावर खुनाचा गुन्हा नोंदविला असून, सध्या तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली आहे.

‘एमबीए’सारखी उच्च पदवी घेतलेली आणि ‘साडी ड्रेपिंग एक्स्पर्ट’ म्हणून ओळखली जाणारी ३५ वर्षीय अक्षता प्रत्यक्षात कॅसिनोमध्ये येणाऱ्या गडगंज श्रीमंतांना हेरून लुटायची. अखेर पोलिसांनी तिला बंगळुरूमधून अटक केली.

उडुपी येथील व्यावसायिक संदीप सलायम (वय ४२ वर्षे) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील ती मुख्य संशयित आहे. आरस्पानी सौंदर्य आणि मधुर वाणी यांच्या साहाय्याने श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात ओढून लुटणारी ती एक सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप यांच्या मृत्यूनंतर अक्षताने त्यांच्या गळ्यातील महागडी सोन्याची साखळी चोरली होती. विशेष म्हणजे, ती हीच सोन्याची साखळी गळ्यात घालून ती बंगळुरूमध्ये बिनधास्तपणे फिरत होती. पोलिसांनी जेव्हा तिला बंगळुरूत पकडले, तेव्हा ती साखळी तिच्या गळ्यात होती. याप्रकरणी कळंगुट पोलिस पुढील तपास करत आहेत.

अन् अक्षतालाही बसला धक्का

घटनेच्या दिवशी अक्षताने तिच्या नेहमीच्याच कार्यपद्धतीचा (मोडस् ऑपरेंडी) वापर करून संदीप यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि रिसॉर्टमधून पळ काढला. मात्र, गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे संदीप यांचा मृत्यू होईल, याची तिला कल्पना नव्हती. शुक्रवारी तिला बंगळुरू येथील स्थानिक न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर केले असता, संदीप यांचा मृत्यू झाल्याचे तिला समजले. ही माहिती तिच्यासाठीही धक्कादायक होती.

...म्हणूनच तिचे धाडस वाढले

यापूर्वीही तिने अनेकांना अशाच प्रकारे लुटले होते. मात्र, काहींनी बदनामीच्या भीतीने तक्रार केली नाही, तर ज्या प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद झाले, तिथे पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही. त्यामुळेच तिचे धाडस वाढत गेले आणि त्याचा दुर्दैवी शेवट संदीप यांच्या मृत्यूने झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT