Karnataka Bandh Protest : बेळगावीतील एका बस कंडक्टरला मराठीत न बोलल्यामुळे मारहाण करण्यात आली होती. या घटनेमुळे कर्नाटकात भाषिक वाद पुन्हा एकदा पेटला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कन्नड समर्थक संघटनांनी शनिवार (२२ मार्च) सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ तासांचा 'कर्नाटक बंद' पुकारला असल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यातून हुब्बळी, बेळगाव अशा वेगवेगळ्या भागांमध्ये कदंब बसेस सेवा पुरवतात मात्र कर्नाटक बंद असल्याने कदंब परिवहनाने ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बंदच्या पार्श्वभूमीवर, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कदंब परिवहन महामंडळाने बेळगाव आणि हुबळी मार्गावरील सुमारे १६ कदंब बसेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गांवर तणाव जास्त असल्याने, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, गोव्याच्या नजदिक असलेल्या कारवार या भागात बंदाचा परिणाम होणार नसल्याने त्या मार्गावर कदंबाची सेवा नियमित प्रमाणे सुरु आहे. सायंकाळी ६ वाजल्यानंतर बंद संपल्यावर, बंगळुरू आणि गुलबर्गा मार्गांवर कदंब बसची सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.
एकाचवेळी १६ बस रद्द झाल्यामुळे कदंब परिवहनाला सुमारे २ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. या घटनेमुळे, बेळगावीतील भाषिक वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सीमाभागातील मराठी आणि कन्नड भाषिक समुदायांमधील संघर्ष हा अनेक वर्षांपासूनचा आहे, मात्र या घटनेमुळे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
कन्नड समर्थक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून त्यांच्याकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. या बंदीमुळे, राज्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
सुरक्षेचा दृष्टीने दुकाने, शाळा आणि इतर व्यावसायिक संस्था बंद राहण्याची शक्यता होती मात्र असे काही संकेत दिसत नाहीत. या घटनेमुळे, बेळगावीतील भाषिक वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राज्यातील शांतता आणि सौहार्द राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.