
नावेली मतदारसंघात भाजपची ‘जनसंपर्क से समर्थन’ मोहीम सुरू करताना आमदार उल्हास तुयेकर यांनी रविवारी मतदारसंघातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची गेल्या नऊ वर्षांतील कामगिरी तुयेकर यांनी नागरिकांसमोर मांडली. मोदी सरकारने देशाला प्रगतिपथावर नेले असून विविध लोकाभिमुख योजनांद्वारे सामान्य जनतेचा जीवनस्तर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुद्दे तुयेकर यांनी नागरिकांसमोर मांडले.
या मोहिमेस जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मोदी सरकारमुळे देशाचा सर्वांगीण विकास होत असून जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे, असे तुयेकर यांनी सांगितले. तुयेकर यांच्या सोबत आके बायशचे सरपंच अविनाश सरदेसाई, पंच रामदास उसगावकर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.