Kadamba Strike: 'कदंबा'चा संप अखेर टळला! चालक, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य; फॉन्सेकांनी दिली खुशखबर

Kadamba Employees Strike: पाच वर्षांहून अधिक सेवा झालेल्या बदली चालक व वाहक यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रमाणे पगार व इतर सुविधा दिल्या जातील.
Kadamba Employees Protest
Kadamba Employees StrikeDainikGomantak
Published on
Updated on

पणजी: कदंबा वाहतूक महामंडळ लिमिटेड मधील कर्मचाऱ्यांचा १९ मार्चपासून होणारा संप अखेर टळला आहे. केटीसीएल व्यवस्थापन आणि केटीसी चालक व संलग्न कर्मचारी संघटना (आयटक) यांच्यात १९ मार्च रोजी समझोता बैठक झाली.

उपकामगार आयुक्त प्रसाद पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सामंजस्य करार झाला असून संघटनेने मांडलेल्या १२ मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयटक सरचिटणीस ख्रिस्तोफर फॉन्सेका यांनी परिषदेत सांगितले.

फोन्सेका म्हणाले, कर्मचाऱ्यांचा पीएफ योगदान दर १ एप्रिल २०२५ पासून १२ टक्के करण्यात येणार आहे. डिसेंबर २००९ पासूनच्या मागील पीएफचा विषय पुढील बैठकीत चर्चिला जाणार आहे. पाच वर्षांहून अधिक सेवा झालेल्या बदली चालक व वाहक यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रमाणे पगार व इतर सुविधा दिल्या जातील. तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरून बदली कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करण्यात येणार आहे.

Kadamba Employees Protest
Kadamba Bus: ‘कदंब’मध्ये ज्‍येष्‍ठांना सीटबाबत माहिती देणार, तक्रार दाखल झाल्यानंतर कार्यवाही; पट्टे रंगविण्‍याचे काम सुरू

७ वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे प्रलंबित असलेले ३४ महिन्यांचे थकीत वेतन दिले जाणार आहे. केटीसीएलने उत्पन्नवाढीसाठी डिजिटल तिकीट प्रणाली आणण्याचे आणि इतर मालमत्तांचा अधिक चांगला वापर करण्याचे आश्वासन दिले आहे. उत्पन्नात दरवर्षी १० टक्के वाढ अपेक्षित असून, त्या वाढीच्या आधारे थकीत वेतन टप्प्याटप्प्याने अदा केले जाईल. या संदर्भात संघटनेशी नियमित बैठक घेतली जाणार आहे.

सध्या ताफ्यात आलेल्या ८० नवीन बससोबतच आणखी ३०० डिझेल बसची तातडीने खरेदी केली जाणार आहे. आंतरराज्य बसमार्ग आता तृतीयपक्ष ठेकेदारांऐवजी केटीसीएलच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांकडूनच चालवले जातील आणि तिकीट तपासकांच्या पदोन्नतीसाठी, वाहन परीक्षकांची नेमणूक, कंडक्टरच्या वेतनश्रेणीत सुधारणा, हेल्पर मेकॅनिकच्या पदोन्नतीसह तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच संघटनेसोबत चर्चासत्र देखील होईल, असे फॉन्सेका यांनी स्पष्ट केले.

Kadamba Employees Protest
Kadamba Protest: वाहतूकमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी! ‘कदंब’चा संप ढकलला पुढे, मागण्यांवर सर्वमान्य तोडग्याचे आश्‍वासन

धोरणात्मक योजना!

‘माझी बस योजना’ ही गोवा सरकारची धोरणात्मक योजना असल्यामुळे तिला हात लावता येणार नाही. तसेच इलेक्ट्रिक बसेसचे ऑपरेशन आणि देखभाल खासगी ठेकेदारांकडे देणे, हे केंद्र सरकारच्या धोरणाचा भाग आहे. त्यामुळे त्यात बदल करता येणार नाही. केटीसीएल व्यवस्थापनाने दिलेल्या स्पष्ट आश्वासनानंतर आणि गोवा सरकारच्या हस्तक्षेपामुळे संघटनेने १९ मार्च २०२५ पासून सुरू होणारा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत आयटकचे सरचिटणीस कॉम्रेड ख्रिस्तोफर फॉन्सेका आणि संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी याची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com