Finasteride Side Effects: टक्कल उपचाराच्या नादात 'मृत्यू'ला आमंत्रण, 'हे' औषध ठरू शकतं जीवघेणं! संशोधनात उघड झालं धक्कादायक सत्य

Finasteride Side Effects Mood Disorder And Suicide Risk: कामाचा ताण, वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि केसांची योग्य काळजी न घेणे या कारणांमुळे सध्या स्त्री-पुरुषांना केस गळतीची गंभीर समस्या उद्भवत आहे.
Finasteride side effects
Finasteride side effectsDainik Gomantak
Published on
Updated on

Finasteride Hair Loss Medicine Dangerous Research 2025

कामाचा ताण, वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि केसांची योग्य काळजी न घेणे या कारणांमुळे सध्या स्त्री-पुरुषांना केस गळतीची गंभीर समस्या उद्भवत आहे. केस गळतीमुळे केस विरळ होतात, काही वेळा तर टक्कल पडते. लांब, दाट आणि काळेभोर केस स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतात आणि आत्मविश्वास वाढवतात. त्यामुळे सर्वजण केस गळती थांबवण्यासाठी विविध घरगुती उपाय, तेलं किंवा औषधांचा वापर करताना दिसतात. पण यापैकीच एक औषध जीवघेणं ठरू शकतं, असा धक्कादायक निष्कर्ष नुकत्याच झालेल्या संशोधनातून समोर आला आहे.

इस्राएलमधील हदासाह-हिब्रू युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर येथे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ‘फिनास्टराइड’ (Finasteride) या लोकप्रिय केस गळतीच्या औषधामुळे मूड डिसऑर्डर (मन:स्थिती बिघडणे) आणि आत्महत्येच्या विचारांचा धोका लक्षणीय वाढू शकतो.

फिनास्टराइड हे औषध १९९० च्या दशकात अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने (US FDA) मंजूर केले होते. सुरुवातीला हे औषध पुरुषांमधील टक्कल आणि प्रोस्टेट ग्रंथी वाढीच्या उपचारासाठी वापरले जात होते. मात्र, संशोधनातून असे दिसून आले आहे की या औषधाचा मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतो. विशेषतः हिप्पोकॅम्पस या भागावर, जो स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि भावना नियंत्रित करतो.

Finasteride side effects
Formula 4 Racing Goa: ‘फॉर्म्युला - 4 रेस’ आम्हाला नकोच! बोगदावासीयांचा निर्धार; जाहीर सभेत कडाडून विरोध

२००२ पासून फिनास्टराइडच्या मानसिक दुष्परिणामांबाबत इशारे दिले जात होते, परंतु एफडीएने २०११ मध्ये केवळ नैराश्याला (Depression) संभाव्य दुष्परिणाम म्हणून सूचीबद्ध केले. त्यानंतर २०२२ मध्ये आत्महत्येच्या विचारांशी त्याचा संबंध मान्य करण्यात आला.

अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. मेयर ब्रेझिस यांनी म्हटलं की, “आता पुरावे फक्त किस्से राहिलेले नाहीत. विविध देश आणि लोकसंख्येमध्ये याच प्रकारचे नमुने दिसत आहेत, आणि त्याचे परिणाम खरोखरच दुःखद असू शकतात.”

डॉ. ब्रेझिस यांनी उघड केलेल्या अंतर्गत एफडीए दस्तऐवजांनुसार, तज्ञांनी २०१० च्या सुरुवातीलाच औषधाच्या लेबलवर “आत्महत्येचे विचार आणि वर्तन” हा इशारा जोडण्याची शिफारस केली होती, पण एजन्सीने कोणतेही स्पष्टीकरण न देता तो सल्ला नाकारला. २०११ पर्यंत एफडीएने केवळ १८ फिनास्टराइडशी संबंधित आत्महत्या नोंदवल्या होत्या, परंतु संशोधकांचा अंदाज आहे की, वास्तविक संख्या जागतिक स्तरावर हजारोंमध्ये असू शकते.

डॉ. ब्रेझिस यांनी औषध निर्मिती करणाऱ्या कंपनी मर्क (Merck) वरही आरोप केला आहे की, त्यांनी फिनास्टराइडची पुरेशी सुरक्षा तपासणी केली नाही आणि नियामक संस्थांनीही ती मागितली नाही. ते म्हणतात की, “कॉस्मेटिक वापरासाठी फिनास्टराइडचे मार्केटिंग त्याच्या सुरक्षिततेचे पुनर्मूल्यांकन होईपर्यंत स्थगित केले पाहिजे.”

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासात आशेची किरणे दिसत आहेत. या संशोधनात असे आढळले आहे की स्टीव्हिया (Stevia) वनस्पतीपासून मिळणारा नैसर्गिक गोडवा स्टेव्हियासाइड (Stevioside), केस वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिनोऑक्सिडिल (Minoxidil) या औषधाचे त्वचेमधील शोषण वाढवू शकतो.

अभ्यासात स्टीव्हियासाइड आणि मिनोऑक्सिडिलच्या संयोजनाने तयार केलेला मायक्रोनीडल पॅच वापरला गेला. या पॅचमुळे औषध त्वचेत अधिक परिणामकारकपणे पोहोचले आणि केसांच्या कूपांमध्ये नवीन केसांची वाढ दिसून आली.

Finasteride side effects
Goa Drug Bust : शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

सिडनी विद्यापीठातील सह-लेखक लिफेंग कांग यांनी म्हटलं, "स्टीव्हियासाइडचा वापर हा केस गळतीवर अधिक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय शोधण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. याचा फायदा जगभरातील लाखो लोकांना होऊ शकतो."

सध्या अँड्रोजेनेटिक अलोपेसिया (Androgenetic Alopecia) ही स्थिती जगभरातील कोट्यवधी लोकांना भेडसावत आहे. अमेरिकेतच सुमारे ८० दशलक्ष लोक या समस्येने त्रस्त आहेत. अंदाजानुसार, ५० वर्षांच्या वयापर्यंत ५०% पेक्षा अधिक पुरुष आणि २५% महिलांना केस पातळ होणे किंवा गळणे जाणवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com