IPL Auction: काऊंटडाऊन सुरु! आयपीएल 2026 लिलावाची तारीख ठरली! रिटेन्शनची डेडलाईनही जाहीर

IPL 2026 auction schedule and venue details: जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग, इंडियन प्रीमियर लीगचा पुढील हंगाम सुरू होणार आहे. लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे.
IPL 2026 Auction
IPL 2026 AuctionDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2026 player auction news and latest updates: जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग, इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा पुढील हंगाम सुरू होण्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलीच वाढली आहे. आगामी आयपीएल २०२६ हंगामासाठी लिलावाची तारीख आता जवळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात या हंगामाचा मोठा लिलाव होणार असून तो १३ किंवा १५ डिसेंबर रोजी पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या वेळी लिलाव परदेशात नव्हे, तर थेट भारतातच होणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे, कारण मागील दोन हंगामांमध्ये लिलाव परदेशात पार पडले होते. आयपीएल २०२३ चा लिलाव दुबईमध्ये, तर आयपीएल २०२४ चा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये झाला होता. त्यामुळे यंदा भारतीय चाहत्यांना लिलावाची थेट मजा देशातच अनुभवता येणार आहे.

क्रिकबझच्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लिलावाच्या तारखांबाबत चर्चा सुरू केली आहे आणि तयारीही जोमात सुरू आहे. त्याचबरोबर, सर्व १० फ्रँचायझींना त्यांच्या कायम ठेवलेल्या (Retained) आणि सोडलेल्या (Released) खेळाडूंची यादी १५ नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयकडे सादर करावी लागेल. ही यादीच पुढील हंगामातील संघबांधणी आणि रणनीतीचा पाया ठरणार आहे.

अजून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी सर्वाधिक खेळाडू सोडण्याची शक्यता आहे. कारण गेल्या हंगामात या दोन्ही संघांचे प्रदर्शन निराशाजनक होते. राजस्थान ९ व्या स्थानावर आणि चेन्नई १० व्या स्थानावर राहिले होते.

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघाने मागील हंगामात इतिहास रचला. तब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या, तर पंजाबने २० षटकांत १८४ धावा करत सामना गमावला.

आता सर्वांचे लक्ष आगामी लिलावावर आणि कोणते खेळाडू कोणत्या संघात जातात यावर असेल. कारण प्रत्येक हंगामात लिलावानंतरच नव्या आयपीएलच्या कहाणीची सुरुवात होते. भारतीय चाहत्यांसाठी हा डिसेंबर महिना पुन्हा एकदा क्रिकेट उत्सव ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com