Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: ज्याने खून केला, त्याचा मृतदेह सापडला कोचीत! मडगावातील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले

Margao Hotel Murder Case: यातील आश्‍चर्यकारक अशी गोष्‍ट म्‍हणजे, हा खून ज्‍याने केला तो संशयित एच. रफिक याचाही मृतदेह केरळातील कोची येथे सापडल्याने या एकंदर प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

Sameer Panditrao

मडगाव: चार दिवसांपूर्वी मडगावातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून  खाली पडून मरण पावलेला मूळ कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील भटकळ येथील बशीर अहमद (३८) याचा मृत्‍यू हा अपघाती नसून त्‍याला मुद्दामहून दुसऱ्या मजल्‍यावरून खाली ढकलून त्याचा खून केल्‍याचे उघड झाले आहे.

यातील आश्‍चर्यकारक अशी गोष्‍ट म्‍हणजे, हा खून ज्‍याने केला तो  संशयित एच. रफिक याचाही मृतदेह केरळातील कोची येथे सापडल्याने या एकंदर प्रकरणाचे गूढ वाढले आहे. या सर्व प्रकरणाचा  तपास करून सत्य उघडकीस आणण्याचे कठीण आव्हान आता मडगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

 शहरातील स्टेशन रोड येथील ग्रीन व्हिव हॉटेलात ३० एप्रिल  रोजी वरील घटना घडली होती.  ज्या खोलीत बशीर राहत होता. त्या खोलीच्‍या दरवाजाला आतून कडी लावली होती. नंतर पोलिसांनी ती उघडली असता काही संशयास्पद बाबी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी तपास काम सुरू केले असता  बशीरला  दुसऱ्या मजल्यावरून खिडकीतून खाली फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते.

Sanqulim Crime

मागाहून   मडगाव पोलिसांनी  खून म्हणून  हे प्रकरण नोंदवून घेतले.  पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पुढील तपास सुरू आहे.  पोलिसांना तपासात रफिकनेच  बशीरला  हॉटेलच्या दुसऱ्या रूममधील खिडकीतून बाहेर फेकून दिले होते असे आढळून आले.

सुरुवातीला पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतले होते. शवचिकत्सा  अहवालात बशीरच्या शरीरावर जखमा आढळून आल्या होत्या. हॉटेलातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी  तपासले त्यावेळी संशयित हॉटेलातील जिन्यावरून खाली उतरत असल्याचे  दिसून आले होते.  पोलिसांना त्याच वेळी त्याच्यावर संशय बळावला होता. त्याचा मोबाईल नंबर मिळवून, पोलिसांनी त्याचा माग काढण्याचा प्रयत्न  सुरू केला होता. सुरुवातीला  त्याचे लोकेशन भटकळ येथे मिळत होते. मात्र, नंतर त्याचा मोबाईल बंद होता. त्यानंतर पोलिसा,नी  त्याचा  शोध सुरूच केला होता.

दरम्यान, कोची  येथे रेल्वेत रफिकचा मृतदेह सापडल्याची माहिती मडगाव पोलिसांना  मिळाली. वर्णनानुसार   तो मृतदेह रफिकचा असल्याचे उघड झाले आहे. त्याचा कुणीतरी काटा काढला असावा, असा पोलिसाना संशय आहे.

सासष्टीत खुनाच्या घटनांत वाढ

सध्या सासष्टीत  खुनाच्या घटना वाढत आहेत. मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात दोन तर फातोर्डा येथे एका खुनाची घडली आहे. या खुनांचा पोलिसानी  छडा लावताना संशयितांना अटकही  केली आहे.  स्टेशन रोड येथे घडलेल्या या खुनाचा माग आता पोलिस काढत आहे. तूर्त तपासाबाबत पोलिसांनी  गुप्तता बाळगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT