
मडगाव: माकाझान येथे अमानुष मारहाण करून सहा वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या आणि त्यानंतर फरार झालेल्या सलीम दम्बल याला मायणा - कुडतरी पोलिसांनी कर्नाटकातील गदग या त्याच्या मूळ गावी जेरबंद केले.
सलीमला सायंकाळी मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. खुनासाठी वापरलेला दांडाही पोलिसांनी जप्त केला आहे. खून घडला तेथेच त्याने तो फेकून दिला होता.
इस्पितळात डॉक्टरांनी सानिकाची तपासणी केली असता, तिला मृत घोषित केले होते. डॉक्टराचे हे शब्द कानी पडल्यानंतर आपले बिंग उघड झाल्याचे कळून चुकल्यानंतर सलीमने आपण सानिकाला दुसऱ्या डॉक्टरकडे नेऊ असे सुमय्याला सांगून तेथून पळ काढला होता.
तो आपल्या मूळ गावी गदग येथे पळून गेल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिसानी एक पथक तेथे पाठवूनही दिले होते. हे पथक संशयिताच्या मागावर होते. शेवटी सलीम हा पोलिसाच्या तावडीत सापडला.
सलीम आपली दुसरी पत्नी सुमय्या आणि तिची मुले सानिका व सन्वित या ंच्यासमवेत माकाझान येथे एका झोपडीत राहत होता. केवळ पाणी दिले नाही म्हणून सानिकाला बेदम मारहाण केली, त्यात तिचा मृत्यू झाला. सुमय्या हिचा मूळ पती हनुमंतराव सुगुर हा गदग येथे राहत असून सुमय्याने त्याला सोडून सलीमशी घरोबा केला होता. पोलिसानी हनुमंतराव याला शोधून काढून त्याला गोव्यात बाेलावून घेतले होते. त्याच्या उपस्थितीत मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर सानिकाचा मृतदेह त्याच्या ताब्यात दिला होता.
या खुनाच्या तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक बाबीही सापडल्या होत्या. यामुळे या खून प्रकारणांचा गुंता वाढला आहे. तपास कामाबाबत पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. सुमय्या आपल्या पतीला न कळविताच आपल्या दोन मुलांसमवेत घर सोडून सलीम याच्यासह गोव्यात आली होती. ते सर्वजण बरोबर राहत होते. पिण्यास पाणी देण्यास नकार दिल्याने सलीमने सानिकाला दांड्याने बेदम मारहाण केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.