Goa Karnataka Mhadei Water Disputr Dainik Gomantak
गोवा

Kalsa Banduri Project: 'म्हादई'च्या परिसंस्थेला धोका! कळसा प्रकल्पावर केंद्रीय समितीची नोंद; पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणामांची शक्यता

Mhadei Water Dispute: समितीसमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, कळसा प्रकल्पामुळे म्हादई नदीतील पाण्याचा प्रवाह लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्नाटकातील कळसा जलवाटप प्रकल्पामुळे म्हादई नदीच्या परिसंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय वन व पर्यावरण विषयक अधिकारप्राप्त समितीने दिला आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील म्हादई अभयारण्यासह जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी स्पष्ट नोंद समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.

समितीसमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, कळसा प्रकल्पामुळे म्हादई नदीतील पाण्याचा प्रवाह लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम नदीवर अवलंबून असलेल्या जंगल परिसंस्थेवर, वन्यजिवांवर तसेच स्थानिक लोकांच्या पाणीपुरवठ्यावर होणार असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

विशेषतः गोव्यातील संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये याचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे समितीचे मत आहे. कर्नाटक सरकारने या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली असली, तरी पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास न करता पुढे जाणे योग्य ठरणार नाही, असे समितीने सूचित केले आहे.

प्रकल्पामुळे आंतरराज्य जलविवाद अधिक तीव्र होण्याची शक्यता असून गोव्याच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही नमूद करण्यात आले आहे.

केंद्राकडे लक्ष!

गोवा सरकारने म्हादई नदी व तिच्या खोऱ्याचे संरक्षण करण्यासाठी आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली असून, कोणत्याही परिस्थितीत म्हादईच्या पर्यावरणावर परिणाम होईल, असे प्रकल्प मान्य केले जाणार नाहीत, असा इशाराही दिला आहे. कळसा प्रकल्पाबाबत केंद्र सरकार कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT