Anmod Check Post
Anmod Check Post Dainik Gomantak 
गोवा

Anmod Check Post: गोव्यातून कर्नाटकात जाताय? आता अनमोड घाटात द्यावे लागणार प्रवेश शुल्क, वन खात्याचा निर्णय

Pramod Yadav

Entry Fee At Anmod Check Post: गोव्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांना आता अनमोड तपासणी नाक्यावर प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. कर्नाटक वन खात्याने व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय वन्यजीव उद्यानातून जाणाऱ्या वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारणी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक वन खात्याने गोव्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांकडून व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय वन्यजीव उद्यानातून जाणाऱ्या वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारणी सुरू केली आहे. अनमोड तपासणी नाक्यावर वाहन चालकांना प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.

अवजड वाहनांसाठी प्रत्येकी 50 रूपये तर हलक्या वाहनांसाठी 20 रूपये प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या शुल्क आकारणीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या अतिरिक्त शुल्काचा बोजा पडणार आले.

दरम्यान, या शुल्क आकारणीवरून वाद होण्याची शक्यता आहे. नव्याने सुरू केलेली ही शुल्क आकारणी प्रवाशांसाठी अतिरिक्त भुर्दंड ठरणार आहे.

म्हादईचा मुद्दा

म्हादईचे पाणी वळवण्यावरून आधीच गोवा आणि कर्नाटक या राज्यात वाद सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीत या राज्यात काँग्रेसचा भरगोस मतांनी विजय झाला असून, लवकरच तेथे काँग्रेसचे सरकार कार्यरत होईल. भाजप सरकारच्या काळात बोम्मई सरकारने म्हादईबाबत घेतलेल्या निर्णयामुळे मोठे वादंग झाले होते. त्यामुळे ताजे काँग्रेस सरकार याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT