Prawah Officers Inspect Mhadei Basin Dainik Gomantak
गोवा

Mhadei River: कर्नाटकने कॅनल खोदून मलप्रभेत पाणी वळवले; सरकारकडे पुरावे असल्याचा CM सावंत यांचा दावा

Mhadei Water Dispute: म्हादईचे पाणी कशा पद्धतीने वळविले आहे हे प्रवाह प्राधिकरणालाही कळणे गरजेचे आहे - प्रमोद सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

म्हादईवरील कळसा भांडुरा प्रकल्पाची आता पावसातच कणकुंबी येथे जाऊन पाहणी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण कर्नाटकने कॅनल खोदून, कशा पद्धतीने म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळविले आहे ते प्रवाह प्राधिकरणाला दिसेल आणि त्यावेळी कर्नाटकचे पितळ उघडे पडेल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत हे महालक्ष्मी शासकीय निवासस्थानावर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आमचा पुराव्यासहीत दावा आहे, की कर्नाटकने कॅनल खोदून मलप्रभा नदीत पाणी वळविले आहे.

म्हादईचे पाणी कशा पद्धतीने वळविले आहे हे प्रवाह प्राधिकरणालाही कळणे गरजेचे आहे. त्यासाठी ही पाहणी गरजेची आहे. प्रवाहने पाहणी केल्यास आम्हाला सर्वोच्च न्यायालयात पुराव्यासह आमची बाजू मांडण्यास देखील चांगले होईल.

'विरोधकांमुळेच म्हादईवर अन्याय'

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, जे विरोधक आज म्हादईसंदर्भात बोलत आहेत, त्यांचे सरकार असताना खरे तर म्हादईसंबंधी अन्याय झाला आहे. जर त्यांना हे आठवत नसेल, तर त्यांनी मागील फायली काढून पाहाव्यात.

आज म्हादईची याचिक सर्वोच्च न्यायालयात आहे, ती देखील आमच्यामुळेच. आज आम्ही आमची बाजू देखील मांडू शकतो. अन्यथा आम्ही केव्हाच हरलो असतो. प्रवाह प्राधिकरण व्हावे ही देखील माझी मागणी होती. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांच्या पक्षाच्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी म्हादई कशा पद्धतीने विकली होती हे प्रथम पाहावे.

आम्ही अन्याय होऊ देणार नाही'

म्हादई तंटा प्रकरणातील याचिकेबाबत विरोधक कितीही बोलत असले आणि कर्नाटकने पंतप्रधानांकडे मागणी केली असली, तरी पंतप्रधान मोदींना म्हादई गोव्यासाठी किती महत्त्वाची आहे याबाबत आम्ही सांगितले आहे. त्यामुळे यासंबंधी निर्णय घेताना गोव्याला विश्वासात घेतले जाईल. गोव्यावर म्हादईसंबंधी अन्याय होणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kirlpal: पाणीपुरवठा करणारी कुपनलिका बंद! संतप्त महिलांची कार्यालयावर धडक; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

LPG Gas Cylinder: सिलिंडरटंचाईचा मोठा फटका! कदंब स्थानकावरील कॅन्टीन बंद, वादावादीचे प्रकार वाढले; काही ठिकाणी चुलीला प्राधान्य

Valpoi: वाळपईत शिगमोत्सवात राडा! 2 ‘रोमटामेळ’ पथकांमध्ये मारामारी; समितीच्या प्रयत्नांमुळे शोभायात्रा शांततेत

Goa Politics: खरी कुजबुज; ...म्‍हणून भाजपकडून रितेशसह दळवींचे नाव

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीतही विरोधकांच्‍या एकीत बेकी! आप, आरजीपीही देणार उमेदवार; 'मगोप' समर्थकांचा भाटीकरांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT