Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

Harvalem Caves And Waterfall: पर्यटनासाठी गोव्यात भेट देत असाल तर उत्तरेतील हरवळे गावाला नक्की भेट द्या.
इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुफा नक्की पाहा
Arvalem Caves And WaterfallDainik Gomantak

पावसाळा म्हटले की निसर्गात भ्रमंती करणाऱ्यांसाठी पर्वणी असते. त्यात गोवा म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला प्रदेश. पावसाळ्यात गोव्याच्या निसर्गात दुप्पटीने वाढ होते. हिरवाईने नटलेला गोवा पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक हजेरी लावत असतात.

एकाच वाटेवर पडणारे ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गाची देणं मिळालेला धबधबा पाहायचा असेल तर डिचोलीतील हरवळे गावाला भेट द्यायलाच हवी.

हरवळे धबधबा

पांडवकालीन गुहेपासून जवळच असणाऱ्या रुद्रेश्वर मंदिराला लागून प्रसिद्ध हरवळे धबधबा आहे. उंचीवरुन पडणारे पाणी आणि समोर असणारा परिसर पर्यटकांना भूरळ घालतो.

शेजारीच असणाऱ्या मंदिराला भेट द्यायला येणारे भाविकांना धबधब्याचा आनंद घेण्याचा मोह आवरत नाही. महत्वाची बाब म्हणजे हरवळे धबधबा एक सुरक्षित धबधबा म्हणून ओळखला जातो.

इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुफा नक्की पाहा
Mandovi Bridge: पणजी - पर्वरीला जोडणारा मांडवी पूल 38 वर्षापूर्वी का कोसळला, रेगे आयोगाचा अहवाल काय?

पांडवकालीन गुहा

हरवळे येथे असणारी पांडवकालीन गुहा अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पांडव वनवास काळात राहिल्याचा पौराणिक संदर्भ आहे. पाचव्या किंवा सहाव्या शतकात या गुहा निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

हरवळे येथील रुद्रेश्वर मंदिराच्या जवळच असणाऱ्या या गुहा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक हजेरी लावत असतात. गुहेत असणारी शिवलिंग संस्कृत आणि ब्राम्ही लिपीतील लेख पाहायला मिळतात. तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com