Karnataka CM Siddaramaiah minister Zameer Ahmed Khan private jet  
गोवा

म्हादई आणि दुष्काळ निधीसाठी मोदींच्या भेटीला गेलेल्या सिद्धरामय्या भाजपच्या निशाण्यावर, जेट प्रवासावरुन टीका

केंद्राकडून दुष्काळी निधी मिळवण्यासाठी दोघेही आलिशान विमानाने दिल्लीत दाखल झाले होते.

Pramod Yadav

म्हादईप्रश्नी आणि दुष्काळ निधीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यमंत्री जमीर अहमद खान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते. सिद्धरामय्या आणि खान यांच्या दिल्ली दौऱ्यासाठी खासगी विमानाने प्रवास केल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.

केंद्राकडून दुष्काळी निधी मिळवण्यासाठी दोघेही आलिशान विमानाने दिल्लीत दाखल झाले, अशा शब्दात भाजप नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसवर टीका केली.

मालवीय यांनी सीएम सिद्धरामय्या आणि जमीर अहमद खान यांचा व्हिडिओ सोशल मीडिया X वर पोस्ट केला आहे. सोबत त्यांनी एक कमेन्ट देखील केली आहे.

“एकीकडे काँग्रेस क्राउडफंडचे नाटक करत आहे. INDI बैठकीत समोसेही दिले जात नाहीत, तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री जमीर अहमद खान हे सीएम सिद्धरामय्या यांच्यासोबत खासगी जेटमध्ये फोटो क्लिक करताना बघायला मिळत आहेत. दुष्काळ निवारणासाठी ते खासगी विमानाने दिल्लीला जात आहेत. दोघे लक्झरी जेटमधून फिरत आहेत. कर्नाटक कुशासनाशी झुंजत आहे पण काँग्रेसची लूट सुरूच आहे."

कर्नाटकचे भाजप नेते सीटी रवी यांनीही हाच व्हिडिओ शेअर केला असून दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत, पण खासगी विमानांमध्ये प्रवास करण्यासाठी पैसे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे समाजवादी असल्याचा दावा करतात पण ते दुष्काळ निवारणाचे कारण देत पैसे मागण्यासाठी खाजगी विमानाने दिल्लीला जातात. आता कर्नाटकातील लोकांना त्यांची कशी मौज चाललीय हे बघता येईल, अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे.

28 डिसेंबर हा काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस आहे. अलीकडेच काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘डोनेट फॉर देश’ ही क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली आहे.

सर्वात जुना पक्ष लोकांकडून देणगी मागत असल्याची ही पहिलीच वेळ आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मंत्रिमंडळातील रिक्त जागी मुख्‍यमंत्री सावंत कुणाची वर्णी लावणार? संपूर्ण राज्‍याचे लक्ष; मायकल संकल्‍प यांच्‍या आशा पल्लवित

'या गुन्ह्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण झालीय, जेनिटोला जामीन देऊ नका'; 'रामा'ची ठाम भूमिका

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Unity Mall Goa Controversy: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी

SCROLL FOR NEXT