Narendra Modi, Siddaramaiah  Dainik Gomantak
गोवा

Narendra Modi: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे 'कळसा-भांडुरा'साठी मोदींना साकडे! 13 शहरांत पायाभूत सुविधांसाठी मागितले दहा हजार कोटी

Kalasa Banduri Project: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि राज्यातील मेकेदाटू जलाशय आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांसाठी तातडीने मंजुरी देण्याबरोबरच अल्पकालीन कृषी कर्ज मर्यादा निश्चित करण्यासाठी दहा हजार कोटींच्या आर्थिक मदतीची विनंती केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka CM Siddaramaiah met Narendra Modi for Kalasa Banduri

पणजी: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज, शुक्रवारी (ता. २९) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यातील महत्वाकांक्षी मेकेदाटू जलाशय आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांसाठी तातडीने मंजुरी देण्याबरोबरच अल्पकालीन कृषी कर्ज मर्यादा निश्चित करण्यासाठी दहा हजार कोटींच्या आर्थिक मदतीची विनंती केली.

दिल्लीत झालेल्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारला कृषी, जलसंपदा आणि शहरी पायाभूत सुविधांसह अनेक मुद्द्यांवर तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री भैरती सुरेश बैठकीला उपस्थित होते.

‘१३ शहरांसाठी १० हजार कोटी द्या’

बंगळूर शहर हे एक ‘टेक हब’ देशाच्या जीडीपीत भर घालते. यासाठी शहर आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी विशेष सहाय्य देण्याची मागणी केली आहे. याशिवाय वेगाने विकसित होणाऱ्या १३ शहरांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी दहा हजार कोटींची मागणी सिद्धरामय्या यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT