Fatorda Dainik Gomantak
गोवा

Fatorda Swimming Pool Accident: आई-वडील जवळ नसताना तो स्विमिंग पूलमध्ये उतरला, कर्नाटकच्या पाच वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda Swimming Pool Accident: स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडाल्याने पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला, त्याला तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

निर्मय रंजन रेड्डी असे मूळचा बंगळुरू, कर्नाटक येथील रहिवासी असलेल्या या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी वार्का येथील एका हॉटेलमध्ये असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पाचवर्षीय मुलगा बुडाला. बुडू लागल्याने त्याला तात्काळ बाहेर काढून गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली होती.

बंगळुरू येथील एक कुटुंब गोव्यात आले होते. वार्का येथील एका हॉटेलमध्ये उतरले होते. दरम्यान, आई-वडील जवळ नसताना तो स्विमिंग पूलमध्ये उतरला; पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.

त्याला पाण्याबाहेर काढून मडगाव येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्याला गोमेकॉत स्थलांतरित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT