Accident Goa Latest News Dainik Gomantak
गोवा

Vagator Accident: पुन्हा दुचाकीचा अपघात, वागातोर येथे कर्नाटकचा 16 वर्षीय युवक ठार

मागील काही दिवसांपूर्वी उत्तर गोव्यात विविध अपघातात चार ते पाच जणांनी आपला जीव गमावला होता.

Pramod Yadav

गोव्यात अपघातांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यात दुचाकी, चारचाकी अपघात होऊन त्यात मृत होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. प्रशासनाकडून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कारवाई केली जात असताना देखील अपघात होताना दिसत आहेत.

विशेषत: दुचाकीचे अपघात अधिक होत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी उत्तर गोव्यात विविध अपघातात चार ते पाच जणांनी आपला जीव गमावला होता. दरम्यान, आज देखील वागातोर येथे झालेल्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे.

वागातोर (बार्देश) येथे गुरूवारी सकाळी 7.30 वा. पेट्रोल पंपानजीक 16 वर्षीय युवकाचा अपघात झाला. या स्वयंअपघातात सूरज चव्हाण (वय 16, मूळ राहणार कर्नाटक) याचा मृत्यू झाला. सूरज वागातोर येथून म्हापशाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

सूरजचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याने आंब्याच्या झाडाला जोराची धडक दिली व तो खाली कोसळला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ जखमी सूरजला म्हापसा जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT