कारगिल विजय दिवस Dainik Gomantak
गोवा

Kargil Vijay Diwas: गोव्यात कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महापौर रोहित मोन्सरत यांनी आझाद मैदानाच्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहिले.

दैनिक गोमन्तक

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आज सोमवारी येथील आझाद मैदानावर माजी सैनिक कल्याण संघटना आणि पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्या वतीने कारगिल युद्धाच्या स्मृतींना मान्यवरांनी उजाळा दिला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महापौर रोहित मोन्सरत यांनी आझाद मैदानाच्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहिले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कारगिल विजय ही घटना देशासाठी अभिमानास्पद असून गोव्याच्या सपुत्रांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे, असे सांगितले. (Kargil Vijay Diwas: Goa CM Pramod Sawant laid a wreath at Martyrs Memorial on Azad Maidan panjim)

कारगिल विजय दिवसानिमित आयोजित विविध स्पर्धातील विध्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आली. माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनंत जोशी यांच्यासह कारगिल युद्धातील सहभागी अधिकारी व सैनिक उपस्थित होते.

कारगिल युद्धात भारताच्या विजय मिळवून 22 वर्षे झाली आहेत. जगातील सर्वोच्च रणांगणावर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. जनरल परवेझ मुशर्रफ यांचे खोटे षड्यंत्र रचण्यात पाकिस्तानी सैन्य गुंतले होते.

पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी सर्व दोष दहशतवाद्यांना घालायला सुरुवात केली होती आणि कारगिल हल्ल्यात पाकिस्तान सैन्याचा सहभाग स्पष्टपणे नाकारला होता. युद्धात मारल्या गेलेल्या त्याच्या शहीद सैनिकांना ओळखण्यास नकारही दिला होता. पण कारगिलच्या डोंगरावर विखुरलेल्या पुराव्यांनी साक्ष दिली आणि त्याचा खोटेपणा उघडकीस आणला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT