Kareena Kapoor Interview: बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा दिवंगत पती संजय कपूर यांच्या नात्यावर तिची बहीण करिना कपूरने मुलाखतीतून अनेक खुलासे केले. करीनाने करिष्मा आणि संजय यांच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळाविषयी सांगितले.
करीनाने मुलाखतीदरम्यान सांगितले की, करिश्मा आणि संजयच्या नात्याबद्दल खूप काही लिहिले गेले. आमच्या अनेक हितचिंतकांनी त्यांचे लग्न मोडेल असे भाकीतही केले होते, पण आम्हाला माहित होते की सर्वकाही ठीक होईल. कोणत्या लग्नात (Marriage) समस्या नसतात? पण जेव्हा वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक होतात, तेव्हा त्यातील गुंता सोडवणे अधिक कठीण होते.
करीनाने सांगितले की, करिश्मा आणि संजयचे नाते पुन्हा रुळावर आले आणि ते दोघेही त्यांचे नाते पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र प्रसारमाध्यमांच्या सततच्या जाहिरातबाजीचा त्यांना खूप त्रास झाला.
नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी करिश्मा आणि संजय गोव्याला (Goa) गेले होते. पण तिथेही माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला, ज्यामुळे त्यांना एकांतात वेळ घालवता आला नाही. करिश्मा आणि संजय एकमेकांवर खूप प्रेम करत होते, असेही करीनाने सांगितले.
2005 मध्ये जन्मलेली त्यांची मुलगी समायरा (Samaira) हिने दोघांना जवळ आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. संजयला आपल्या मुलीवर किती प्रेम आहे, हे सांगताना करीनाने म्हटले की, "संजय एका पोलो टूर्नामेंटमध्ये (Polo Tournament) सहभागी होणार होता. विशेष म्हणजे त्या स्पर्धेतील ट्रॉफीला समायराचे नाव देण्यात आले होते."
दरम्यान, करिश्मा आणि संजय हे अनेक वर्षांनंतर वेगळे झाले असले तरी त्या कठीण काळात करीनाने आपल्या बहिणीला दिलेला भावनिक आधार आणि पाठिंबा आजही चर्चेला जातो.
मात्र करिश्माचा पती संजय कपूरचे 12 जून 2025 रोजी एका पोलो सामन्यादरम्यान दुर्दैवी निधन झाले. पोलो खेळत असताना एका मधमाशीने त्याच्या घशाला डंख मारल्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तो 53 वर्षांचा होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.