Kareena Kapoor In Goa: मैं अपनी फेव्हरेट हूं! हा डायलॉग नव्हे माइंडसेट; करीना कपूरने सांगितला आनंदी आयुष्याचा मंत्र

Kareena Kapoor Goa Fest 2025: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरनेही गोवा फेस्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने संवादादरम्यान अनेक गोष्टींनी उजाळा दिला.
Kareena Kapoor Goa Fest 2025
Kareena KapoorDain ik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात दोनापावला येथे गोवा फेस्ट 2025 ची दणक्यात सुरुवात झाली आहे. दरवर्षी गोवा फेस्टिव्हल मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये विविध क्षेत्रातील नामवंताना आमंत्रित केले जाते. यावर्षीची गोवा फेस्टची थीमही प्रभावित करणारी आहे. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारे नामवंत व्यक्ती आपले विचार उपस्थितांसमोर मांडतात.

दरम्यान, यंदाच्या गोवा फेस्टमध्ये बॉलिवूड सिने अभिनेते, अभिनेत्री हजेरी लावत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंगनेही या फेस्टिव्हलला हजेरी लावली. त्याने यावेळी परफॉर्मन्स देखील केला. 'सुभा होने ना दे, जिंता ता चिता चिता आणि आंख मारे' या त्याच्या हिट गाण्यांना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

Kareena Kapoor Goa Fest 2025
Goa CM Pramod Sawant: गोवा भोग नव्हे योगभूमी, जगात भारताची 'हिंदुस्थान' म्हणून ओळख; मुख्यमंत्री सावंत

मिका सिंगच्या शानदार परफॉर्मन्सनंतर रिशाद टोबॅकोवाला यांचे 'इग्नाइट द ह्यूमन' या थीमवर आधारित सत्र पार पडले. यावेळी त्यांनी सांगितले की, "एआयला अजूनही आपल्या समाजात कमी लेखले जात असून आपण त्याची क्षमता अजूनही समजू शकलो नाहीत. एआय संगणकीय विश्लेषण आणि कोडिंग चुटकीसरशी करत आहे. तेव्हा आपण आपल्या मानवी क्षमता अधिक गतीने विकसित केल्या पाहिजेत.''

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरनेही (Kareena Kapoor) गोवा फेस्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने संवादादरम्यान अनेक गोष्टींनी उजाळा दिला. तिने गोवा फेस्टमध्ये "मैं अपनी फेव्हरेट हूं: नॉट जस्ट अ लाईन. अ माइंडसेट" या थीमवर अधारित अतिका फारुकीशी संवाद साधला.

तिने संवादादरम्यान सांगितले की, तिच्या 'जब वी मेट' चित्रपटातील 'मैं अपनी फेवरेट हूं' हा डॉयलॉग खूप काही सांगून जातो.

करीना सांगते, 'मैं अपनी फेव्हेरट हूं...', असा विचार आणि भावना प्रत्येक महिलेने बाळगली पाहिजे. मला नेहमीच असं वाटतं. फक्त चित्रपटातच नाहीतर प्रत्यक्ष जीवनातही मी स्वत:वर खूप प्रेम करते आणि ते पुढेही नेहमीच करत राहीन. म्हणूनच मी आनंदी आहे. मला वाटतं प्रत्येकाने असा विचार बाळगला पाहिजे. फक्त महिलांनीच नाही तर पुरुषांनीही असा विचार केला पाहिजे.''

Kareena Kapoor Goa Fest 2025
Pramod Sawant: 'आरोग्य सांभाळा, तीच मला भेट', CM सावंतांनी बर्थडे सेलिब्रेशन टाळले; साखळीत मेगा आरोग्य शिबिर

करीनाने पुढे सांगितले की, 'तुम्ही आनंदी असणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः जेव्हा एखादी स्त्री आई होते, माझ्यासारखी. मला वाटतं की जगातील सर्वोत्तम आई ती असते जी आनंदी असते. नऊ महिन्यांनंतर मुलाला जन्म देणे आणि नंतर बाळाची काळजी घेणे हे आईसाठी सोपे नसते. या काळात आईला अनेक परिस्थितींमधून जावे लागते.'

Kareena Kapoor Goa Fest 2025
Pramod Sawant: वाढदिवस साजरा करणार नाही! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय; सर्व कार्यक्रम रद्द

भारतीय चित्रपटसृष्टीविषयी बोलताना करीना पुढे म्हणाली की, 'आजच्या डिजिटल युगाने संधी वाढवल्या आहेत. कलाकारांसाठी हा एक उत्तम काळ आहे. आता भाषेचे बंधन राहिलेले नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या कला गुणांच्या जोरावर आपली ओळख निर्माण करत आहे. तसेच, प्रेक्षकही खुलेपणाने विचार करणारे आहेत. त्यांना एखादी कलाकृती आवडली तर तिला ते डोक्यावर घेतात.'

तसेच, माध्यमांशी संवाद साधण्याबद्दल विचारले असता तिने कबूल केले की, तिचा दृष्टिकोन अधिक निवडक झाला आहे. करीना म्हणाली की, "मी नेहमीच प्रामाणिक राहिले आहे. आता मी माझ्या कलेवर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com