Karapur sarvona Dainik Gomantak
गोवा

Karapur Sarvona: ..आणि 'तो' मीटिंगमधून पळाला! कारापूर-सर्वण पंचायतीत गोंधळ; 2 महिला पंचसदस्‍यांना शिवीगाळामुळे गदारोळ

Karapur Sarvona Controversy: : कारापूर-सर्वण पंचायतीच्या बैठकीत व्यापारी परवाना घोटाळा आणि महिला पंचसदस्यांशी शिवीगाळ प्रकरणावरून गदारोळ माजला.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : कारापूर-सर्वण पंचायतीच्या बैठकीत व्यापारी परवाना घोटाळा आणि महिला पंचसदस्यांशी शिवीगाळ प्रकरणावरून गदारोळ माजला. आरोपांचा भडका उडाल्याने माजी सरपंच असलेले एक पंचसदस्य बैठक अर्ध्यावर सोडूनच पळून गेले.

सरपंच लक्ष्मण गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मासिक बैठकीला नऊ पंचसदस्य उपस्थित होते. तर ज्ञानेश्वर बाले आणि उज्‍ज्वला कवळेकर अनुपस्थित राहिले. बैठकीवेळी पोलिस उपस्थित राहिल्याने पंचसदस्य बुचकळ्यात पडले. पोलिस बंदोबस्त मागवला नसल्याचे सरपंच गुरव यांनी स्पष्ट केले.

पंचायत क्षेत्रातील एका फास्ट फूड विक्रेत्याचा व्यापारी परवाना नूतनीकरण करताना गंभीर अनियमितता झाल्याचे या बैठकीत उघड झाले.

सरपंचांच्या सहीचा बनावट वापर करून माजी सरपंच असलेल्या एका पंचसदस्याने हा परवाना दिल्याचा आरोप करण्यात आला. या बेकायदेशीर कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करत संबंधित पंचसदस्यावर आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला.

यासंदर्भात कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पत्रव्यवहार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. माजी सरपंच आणि विद्यमान पंचसदस्य खारकांडे यांनी दोन महिला पंचसदस्यांना शिवीगाळ केली, असा आरोप असून यासंदर्भात पोलिस आणि इतर यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

या प्रकरणावरून बैठकीत पुन्हा वाद निर्माण झाला. शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या पंचसदस्याची आईसुद्धा पंचायतीची सदस्य असल्याने ती आणि अन्य महिला सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

महिला सदस्यांनी व्‍यक्त केला संताप

 माजी सरपंचाने शिवीगाळ केल्याचा आरोप

 पोलिसांकडे तक्रार दाखल

 बैठकीत पुन्हा वादावादी

 पंचायतीत महिला सुरक्षित नसल्‍याचा आरोप

घोटाळ्याची पार्श्वभूमी

फास्ट फूड विक्रेत्याचा परवाना नूतनीकरण करताना सरपंचांच्या बनावट सहीचा वापर झाल्‍याचा आरोप. पंचायतीला कल्‍पना न देता परवाना केला जारी. आर्थिक गैरव्यवहाराचाही आरोप. वरिष्‍ठ पातळीवरून प्रकरणाची चौकशी सुरू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पूजा नाईकने यापूर्वी कोणाचेही नाव घेतले नव्हते", CM सावंतांनी सांगितले 'नवीन FIR' चे कारण

Delhi Car Blast: दिल्ली ब्लास्टचे पाकिस्तान कनेक्शन! संशयितांच्या चौकशीतून दहशतवादी संघटनेशी जुळले तार; जै-ए-मोहम्मदचा कमांडर निशाण्यावर

IFFI 2025: "भारतात तुम्हाला ज्युरी म्हणून एकही महिला मिळाली नाही?", सुरू होण्यापूर्वीच इफ्फी वादाच्या भोवऱ्यात

Rashid Khan Marriage: राशिद खान पुन्हा बोहल्यावर? मिस्ट्री वुमनसोबतचा फोटो व्हायरल, पोस्टमधून दिलं 'हे' स्पष्टीकरण!

Goa Cabinet Decision: मुख्य अभियंत्यासाठी वयाची अट शिथिल, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग, ईपीएफ परतावा, वाचा गोवा कॅबिनेटचे तीन मोठे निर्णय?

SCROLL FOR NEXT