Sarvona: सर्वण पंचायतीचे लाखो रुपये वाया! जाळीसह, लोखंडी रॉडही गायब,कचरा नियंत्रणाच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ

Gokulwada Sarvona: कचऱ्याची भयानक समस्या नियंत्रणात आणण्यासाठी गोकुळवाडा-सर्वण येथे स्थानिक पंचायतीने रस्त्याच्या बाजूने लावलेल्या जाळीसह पाईपसदृश लोखंडी रॉडही सध्या गायब झाले आहेत.
Gokulwada Sarvona garbage issue
Gokulwada Sarvona garbage issueDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : कचऱ्याची भयानक समस्या नियंत्रणात आणण्यासाठी गोकुळवाडा-सर्वण येथे स्थानिक पंचायतीने रस्त्याच्या बाजूने लावलेल्या जाळीसह पाईपसदृश लोखंडी रॉडही सध्या गायब झाले आहेत.

अन्य ठिकाणी लावण्यात आलेली जाळी मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कचरा नियंत्रणासाठी कारापूर-सर्वण पंचायतीने केलेली उपाययोजना पूर्णपणे फसली आहे. लाखो रुपये वाया गेल्यातच जमा झाले आहेत.

सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पंचायत इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त कारापूर येथे आले होते. त्यावेळी कचऱ्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी पंचायतीला फैलावर घेतले होते. त्यानंतर पंचायतीने लागलीच स्वच्छता मोहीम हाती घेताना कचऱ्याची अस्वच्छता निर्माण झालेले परिसर चकाचक केले होते.

Gokulwada Sarvona garbage issue
Karapur Sarvona: ‘भाटकार’शाहीखाली असलेली 1971 पूर्वीची घरे नियमित करा, सर्वणच्या ग्रामसभेत मागणी; कचऱ्याचा विषयही तापला

रस्त्याच्या बाजूने कचऱ्याचे प्रमाण नियंत्रणात यावे. यासाठी कारापूर-सर्वण पंचायतीने चार महिन्यांपूर्वी म्हणजेच पावसाळ्यापूर्वी कचऱ्यासाठी ब्लॅकस्पॉट बनलेल्या मुख्य रस्त्यासह विविध भागात पाईपसदृश्य लोखंडी रॉड पुरून ‘जाळी’ मारली होती.

Gokulwada Sarvona garbage issue
Waste Management: वाहनातून कचरा फेकताना आढळल्यास 10 हजार दंड, परवानाही रद्द होणार; CM सावंतांचा इशारा

मात्र पंचायतीचा हा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. गोकुळवाडा-सर्वण येथील मुख्य रस्त्याच्या बाजूने लावलेली जाळी आणि ती लावण्यासाठी बसविण्यात आलेले लोखंडी ‘रॉड’ ही आता अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे सध्या अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. जाळीसह रॉड चोरीला गेले असावेत, अशी चर्चा गावात चालू आहे. दरम्यान, वाठादेव येथे बगलमार्ग आदी भागात लावलेली जाळी मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com