Karapur Sarvan Illegal Constructions Dainik Gomantak
गोवा

Karapur Sarvan Illegal Constructions: बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरुन कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा तापली, ग्रामस्थांच्या आरोपांमुळे गदारोळ

One Goa mega housing project controversy: बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून कारापूर-सर्वण पंचायतीची रविवारची ग्रामसभा काहीशी तापली. दुसरीकडे, वादग्रस्त ‘वन गोवा’ या मेगा निवासी प्रकल्पावरून ग्रामसभा तापणार, असा अंदाज होता. मात्र, तसे काही घडले नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून कारापूर-सर्वण पंचायतीची रविवारची ग्रामसभा काहीशी तापली. दुसरीकडे, वादग्रस्त ‘वन गोवा’ या मेगा निवासी प्रकल्पावरून ग्रामसभा तापणार, असा अंदाज होता. मात्र, तसे काही घडले नाही.

या ग्रामसभेला प्रकल्पविरोधी ग्रामस्थांची उपस्थितीही कमी होती. तरीही, संबंधित प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंचायतीने जारी केलेली ‘काम बंद’ नोटीस पंचायत संचालकांनी रद्द केली आहे काय, असा प्रश्न प्रकल्पविरोधी ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्यावर पंचायतीला त्यासंदर्भात कोणताही आदेश मिळालेला नाही, असे सरपंचांनी स्पष्ट केले. नोटीस रद्द केली असल्यास पंचायत संचालकांच्या निर्णयाला पंचायतीने न्यायालयात (Court) आव्हान द्यावे, अशी मागणी प्रकल्पविरोधी ग्रामस्थांनी केली. तसा ठरावही गौरेश घाडी आणि इतरांनी ग्रामसभेत मांडला.

सरपंच योगेश पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. सरपंच पेडणेकर यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिव महादेव नाईक यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. पंचायत क्षेत्रात बेकायदा प्रकल्पांसह इतर बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांसंदर्भात यापूर्वी ग्रामसभेत आवाज उठवूनही पंचायत मंडळ त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. पंचायतीच्या आशीर्वादाने बेकायदेशीर गोष्टी घडत असल्याचा आरोप नंदा सावळ यांनी केला. या आरोपामुळे ग्रामसभेतील वातावरण काहीसे तापले.

एका खासगी कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यापासून वंचित आहोत, अशी तक्रार पार्वतीनगर येथील युवकांनी केली. धड रस्ता नसल्याने आमचे हाल होत आहेत, अशी कैफियत मांडत त्यांनी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

समीर वायंगणकर यांनी कारापूर येथील प्रलंबित क्रीडामैदानाचा प्रश्न उपस्थित करून त्याच्या कामाला त्वरित चालना देण्याची मागणी केली. रात्रीच्या वेळी लोकवस्ती तसेच शाळांजवळ मद्यपींचा वावर वाढला आहे. मद्याच्या रिकाम्या बाटल्या मिळेल त्या ठिकाणी टाकल्या जातात, अशी तक्रार महिला ग्रामस्थांनी केली. कचऱ्याचा प्रश्नही ग्रामसभेत चर्चेला आला. लोकवस्तीजवळ रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मयूर मोरजकर, नीता मोरजकर, विजय मठकर आदींनी चर्चेत भाग घेत विविध प्रश्न उपस्थित केले.या सभेला उपसरपंच बीबी आयेशा मागोड यांच्यासह दिव्या नाईक, तन्वी सावंत, अवनी (बिंदिया) सावंत, उज्वला कवळेकर, लक्ष्मण गुरव आणि दामोदर गुरव उपस्थित होते. दत्तप्रसाद खारखांडे, सुकांती खारखांडे आणि ज्ञानेश्वर बाले अनुपस्थित होते.

पोलिस बंदोबस्त तैनात

ग्रामसभेला जेमतेम शंभर ग्रामस्थ उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डिचोलीचे पोलिस निरीक्षक विजय राणे सरदेसाई लक्ष ठेवून होते. किरकोळ वादाचा अपवाद वगळता ग्रामसभा सुरळीत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

39 व्हिला, स्विमिंग पूलची परवानगी रद्द करा, तुये ग्रामसभेत मागणी; आयटी कन्व्हेन्शन सेंटर आणि कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

IND vs NZ ODI LIVE Streaming: मिशन न्यूझीलंड! रोहित- विराट मैदानात उतरणार! वनडे मालिकेचा थरार कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह?

Marathi language: "मराठीला राजभाषा हा आमचा हक्क, भीक नाही!", प्राचार्य सुभाष वेलिंगकरांचा सावंत सरकारला स्पष्ट इशारा

सत्तेसाठी सारे, गावासाठी कोण? पंचांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थ संताप; बेतकी-खांडोळा पंचायतीच्या कारभारावर गंभीर सवाल

Accident News: मंगलकार्य आटोपून घरी निघाले अन् वाटेत काळाने गाठले! कार- ट्रेलरची जोरदार धडक; 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT