Miramar Accident Dainik Gomantak
गोवा

Miramar Accident: करंझाळे अपघात; अल्पवयीन चालवत होता 'ती' स्कॉर्पियो

बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने झाला होता अपघात

गोमंतक ऑनलाईन टीम

Miramar Accident: मिरामार-दोना पावला मार्गावर करंझाळे येथे काही दिवसांपुर्वी झालेल्या अपघातातील स्कॉर्पियो हे वाहन अल्पवयीनाकडून चालवली जात होती, अशी माहिती समोर येत आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता.

या अपघातप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. या अपघातात स्कॉर्पियोची अवस्था वाईट झाली होती. सुदैवाने या अपघातात कुणाचाही मृत्यू झालेला नसला तरी दोघे जण जखमी झाले होते. रॅश आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले होते.

दरम्यान, आता पोलिस काय कारवाई करणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण काही काळापासून अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जात आहे. गेल्या काही काळात अपघातास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीनांच्या पालकांवर अशा प्रकारे कारवाई देखील करण्यात आली आहे.

काही दिवसांपुर्वीच मिरामार ते दोना पावला रस्त्यावर करंझाळे येथे हा अपघात झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. अपघातानंतर हे फुटेज व्हायरल झाले होते.

या स्कॉर्पियो गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीची कदंबा बसला धडक बसली होती. त्यानंतर ही चारचाकी विजेच्या खांबावर धडकली होती. या अपघातात स्कॉर्पियोमधील 2 प्रवासी जखमी झाले होते. त्यांना बांबोळी येथील गोमॅको रूग्णालयात दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यास रोखलं म्हणून गोळी घातली; अमेरिकेत भारतीय तरुणाचा खून

Nepal Protest: राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, गृहमंत्र्यांच्या घराला लावली आग! नेपाळमध्ये राडा सुरुच; PM ओली सोडणार देश?

Goa Chess: 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वाढली चुरस! शौनक, दीक्षिता विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू,भाजपकडे अधिक खासदार; पण विरोधकांना 'क्रॉस व्होटिंग'ची आशा

Bits Pilani: 9 महिन्यांत पाच मृत्यू का झाले? विद्यार्थ्यांचे मानसिक दडपण कसे दूर होणार?

SCROLL FOR NEXT