Sharan Meti | Kannad Dhangar Samaj  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्नी कन्नड धनगर समाजाचाही गोव्याला पाठिंबा

याआधी कन्नड महासंघानेही आपली भूमिका जाहीर करत गोवा सरकारला आपला पाठिंबा दिला होता.

आदित्य जोशी

म्हादईप्रश्नी कन्नड महासंघानंतर आता गोव्यातील कन्नड धनगर समाजानेही गोव्याला पाठिंबा जाहीर केला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचं नेते शरण मेटी यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी कन्नड महासंघानेही आपली भूमिका जाहीर करत गोवा सरकारला आपला पाठिंबा दिला होता. कन्नड महासंघाच्या सिद्धाण्णा मेटी यांनी कालच शुक्रवारी आपली भूमिका जाहीर केली होती.

ऑल गोवा कन्नड महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्धाना मेटी म्हणाले की, आमचा जन्म जरी कर्नाटकात झालेला असला तरी गोवा ही आमची कर्मभुमी आहे. आम्ही राहतो गोव्यात. कमावतो गोव्यात. खातो गोव्यात. त्यामुळे म्हादई साठीच्या लढ्यात आम्ही गोव्यासोबत आहोत. म्हादईच्या प्रश्नाचा वापर राजकारणासाठी होता कामा नये. माझी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी हा प्रश्न सोडवावा.

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी यासंबधीची सुनावणी झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारवर नामुष्की ओढावली. आता या प्रकरणात विधिज्ञांची मदत घेण्यात येत आहे. राज्याचे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी भोपाळमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेत निवेदन दिले होते. त्यात डीपीआर मंजुरी मागे घ्यावी, तसेच तातडीने जल प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या मुद्यावर आता जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन या पक्षाने पुढाकार घेतला आहे. रविवारी अनेक पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत आझाद मैदानावर या आंदोलनाची ठिणगी पेटणार आहे. कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे पाणी वळवू द्यायचे नाही, यासाठी आता रस्त्यावर उतरत जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

SCROLL FOR NEXT