Mahadayi Water Issue: कर्नाटकात जन्मलो असलो तरी 'म्हादई'बाबत गोव्याच्या ठामपणे पाठिशी...

ऑल गोवा कन्नड महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्धाना मेटी यांचे मत
Mahadayi Water Issue
Mahadayi Water IssueDainik Gomantak

Mahadayi Water Issue: म्हादई नदीवरील कळसा, भांडुरा प्रकल्पात कर्नाटकच्या नव्या डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिल्यानंतरपासून गोव्यात म्हादई नदी पाणीवाटपाचा प्रश्न पुन्हा रडारवर आला आहे. गोव्यात सर्वच स्तरातून कर्नाटकच्या भुमिकेवर टीका होत असून राज्य मंत्रीमंडळ याबाबत केंद्रीय गृह मंत्र्यांना भेटणार आहे. दरम्यान, आता लोकांमधुनही या प्रश्नाबाबत आवाज उठवला जाऊ लागला आहे.

Mahadayi Water Issue
Three kings Feast : गोव्यात साजरे होणारे 'थ्री किंग्स फेस्त' नेमके आहे तरी काय? वाचा सविस्तर

ऑल गोवा कन्नड महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्धाना मेटी म्हणाले की, आमचा जन्म जरी कर्नाटकात झालेला असला तरी गोवा ही आमची कर्मभुमी आहे. आम्ही राहतो गोव्यात. कमावतो गोव्यात. खातो गोव्यात. त्यामुळे म्हादई साठीच्या लढ्यात आम्ही गोव्यासोबत आहोत. म्हादईच्या प्रश्नाचा वापर राजकारणासाठी होता कामा नये. माझी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी हा प्रश्न सोडवावा.

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी यासंबधीची सुनावणी झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारवर नामुष्की ओढावली. आता या प्रकरणात विधिज्ञांची मदत घेण्यात येत आहे. राज्याचे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी भोपाळमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेत निवेदन दिले होते. त्यात डीपीआर मंजुरी मागे घ्यावी, तसेच तातडीने जल प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी केली आहे.

Mahadayi Water Issue
Mahadayi Water Dispute: म्हादईसाठी अखेर जनआंदोलन; 'या' तारखेपासून एल्गार

दरम्यान, या मुद्यावर आता जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन या पक्षाने पुढाकार घेतला आहे. रविवारी अनेक पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत आझाद मैदानावर या आंदोलनाची ठिणगी पेटणार आहे. कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे पाणी वळवू द्यायचे नाही, यासाठी आता रस्त्यावर उतरत जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com