Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमीची तज्ञांकडून होणार तपासणी; समितीचा अहवाल आल्यानंतरच बंदबाबतचा निर्णय

Kala Academy Renovation: कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या कृती दलाच्या शिफारशीनुसार अकादमची १६ पासून तज्ज्ञ समिती पाहणी करणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या कृती दलाच्या शिफारशीनुसार अकादमची १६ पासून तज्ज्ञ समिती पाहणी करणार आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच अकादमी बंद ठेवायचा की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अकादमीचे चेअरमन चंद्रकांत कवळेकर यांनी जाहीर केले.

मद्रास आयआयटीने अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांचा तपासणी अहवाल कृती दल व अकादमी व्यवस्थापनाला सादर केला आहे. त्या अहवालाच्या आधारावर टास्क फोर्सचे चेअरमन विजय केंकरे व सदस्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे आयआयटी मद्रासच्या अहवालात नमूद केले आहे.

त्यामुळे सरकारने नियुक्त केलेल्या कार्यगटाने (टास्क फोर्स) दीनानाथ मंगेशकर सभागृहात सुधारणात्मक दुरुस्तीचे काम करण्यासाठी १ ऑगस्टपासून ते बंद ठेवण्याची शिफारस केली. हे काम साधारणपणे दोन ते तीन महिने चालण्याची शक्यता आहे.

त्यावर आता चेअरमन कवळेकर यांचे सुमारे सहा दिवसांनी टास्क फोर्सच्या शिफारशीवर स्पष्टीकरण दिले आहे. शिफारशीनुसार अकादमीच्या कामांची तपासणी तज्ज्ञ समिती उद्या ता. १६ पासून सुरू करणार आहे. समितीचा अहवाल आल्यानंतरच अकादमी व्यवस्थापन ती बंद ठेवायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कवळेकर यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT