AC failure Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: 'पुरुष'नंतर 'दामोदरपंतानां'ही फटका; भरत जाधवाच्या नाटकावेळी कला अकादमीच्या एसीत बिघाड!

Kala Academy AC issue: श्रीमंत दामोदरपंत या नाटकाच्यावेळी पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत

Akshata Chhatre

पणजी: कला अकादमीत गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते आणि वक्ते शरद पोंक्षे यांच्या पुरुष नाट्यच्यावेळी कला अकादमी पणजी येथे लाईट्स फ्लिकर झाल्याने नाटक पहिल्या प्रयोगाच्यावेळीच काही काळ थांबवावं लागलं, यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झालाच शिवाय मंत्री गावडे आणि शरद पोंक्षे यांच्यात रणधुमाळी सुरु झाली आहे आणि अशातच आता श्रीमंत दामोदरपंत या नाटकाच्यावेळी पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत.

रविवार (दि. २०) रोजी संध्याकाळी कला अकादमीमधील दिनानाथ मंगेशकर सभागृहाच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रेक्षक नाराज झालेत. श्रीमंत दामोदरपंत हे मराठीतील प्रसिद्ध नट भरत जाधव यांचं गाजलेलं नाटक आहे आणि सध्या या नाटकाचा गोवा दौरा सुरु आहे.

कला अकादमी पणजी येथे रविवारी या नाटकाला नाट्यप्रेमींचा गट जमला असता अचानक प्रयोगावेळी कला अकादमीच्या वातानुकूलीन (एसी) व्यवस्थेत बिघाड झाला, सध्या गोव्यातील वातावरण पाहता परिणामी प्रेक्षक नाराज झाले आहेत आणि नाटकाच्या प्रयोगापूर्वी यंत्रणा दुरुस्त करावी अशी मागणी केली जातेय.

'पुरुष'मुळे पोंक्षे नाराज

मराठी सिने तसेच नाट्यसृष्टीतील एक गाजलेलं नाव म्हणजे शरद पोंक्षे, यंदाच्यावेळी पोंक्षे यांचा गोवा दौरा काही खास ठरला नव्हता. कला अकादमीमध्ये सुरु असलेल्या प्रयोगाच्यावेळी अचानक यंत्रणेत बिघाड झाल्याने नाटक थांबलं होतं आणि यावर पोंक्षे यांनी खेद व्यक्त केला होता.

मात्र कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी हा पूर्णपणे तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत काढता पाय घेत पोंक्षे त्याच्यावर आरोप करत असल्याचं थेट वक्तव्य केलं होतं, आणि सध्या अभिनेते शरद पोंक्षे आणि प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्यात सदर प्रसंगावरून शेरेबाजी सुरुच आहे. या परिस्थितीत पुन्हा कला अकादमीमध्ये निर्माण झालेला पेच नवीन प्रश्न निर्माण करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: पाकिस्तानी अंपायरचा तो 'अजब' निर्णय! ऑस्ट्रेलियन खेळाडूही चक्रावले, नेटकरी म्हणाले, "अशा अडाणी लोकांना अंपायर कोणी केलं?"

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT