Kala Academy
Kala AcademyDainik Gomantak

Kala Academy: मंत्री गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून हटवा; अभिनेते शरद पोंक्षेंवर केलेल्या 'सुपारीबाज' वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

Goa Congress: गोवा काँग्रेसचे उत्तर जिल्हा सरचिटणीस आणि नाट्य कलाकार प्रणव परब यांनी या वक्तव्याचा निषेध करत भाजप सरकारच्या सांस्कृतिक धोरणांवर गंभीर आरोप केले.
Published on

पणजी: गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्याबाबत केलेले ‘सुपारीबाज’ हे वक्तव्य अत्यंत लज्जास्पद, असभ्य आणि निषेधार्ह असल्याचे तीव्र शब्दांत सांगत काँग्रेस पक्षाने गावडे यांना तत्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

गोवा काँग्रेसचे उत्तर जिल्हा सरचिटणीस आणि नाट्य कलाकार प्रणव परब यांनी या वक्तव्याचा निषेध करत भाजप सरकारच्या सांस्कृतिक धोरणांवर गंभीर आरोप केले.

मी स्वतः नाट्यक्षेत्रात सक्रिय असलेला कलाकार आहे. त्यामुळे गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यानेच एका कलाकारावर अशा पातळीवर टीका करणे हे केवळ अपमानास्पदच नव्हे, तर धोकादायक आहे,” असं प्रणव परब यांनी म्हटलं.

Kala Academy
Goa Opinion: तुम्ही गैर वागलात, त्याहीपेक्षा तुम्ही गैर बोललात!

भाजप सरकारकडून कलाकार, लेखक, आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांचा अपमान हे आता अपवाद राहिलेले नाही, तर नित्याचे चित्र बनले आहे. सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याऐवजी, हे सरकार कलाविश्वाचे राजकारण करून आपल्या विचारधारेशी असहमती दर्शविणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रयत्न करत आहे.

गोवा कला अकादमीतील लाईट सिस्टीमचं अपयश हे भाजपच्या अकार्यक्षमतेचं ज्वलंत उदाहरण असल्याचंही परब यांनी नमूद केलं. "ही तीच संस्था आहे जिथे जगप्रसिद्ध कलाकारांनी सादरीकरण केलं आहे. आज मात्र तीच संस्था कोलमडलेल्या अवस्थेत आहे. याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी गावडे यांनी कलाकारांवरच टीका करून अपमान केला,” अशी टीका परब यांनी केली.

Kala Academy
Goa Drug Case: गोवा पोलिसांचा दणका! वागातोर येथे 2.20 लाखांच्या ड्रग्जसह मुंबईतील तरुणाला अटक

गोविंद गावडे यांनी केवळ संबंधित नाटकाच्या टीमची नव्हे, तर गोमंतकीय जनतेची माफी मागायला हवी होती. मात्र माफी मागण्याऐवजी त्यांनी कलाकारांवरच अपमानास्पद टिका केली.

अशा व्यक्तीस कला आणि संस्कृती खात्याची जबाबदारी देणं हे गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेची विटंबना आहे,” असे म्हणत परब यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची ठाम मागणी केली आहे.

कलाकार हे समाजाचे आत्मा असतात. त्यांच्यावर असे हल्ले करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेवरच हल्ला होय.

काँग्रेस पक्ष गोव्यातील प्रत्येक कलाकार, सादरकर्ते व सांस्कृतिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. भाजपकडून सुरू असलेल्या दडपशाहीच्या राजकारणातून गोव्याची समृद्ध संस्कृती नष्ट होऊ देणार नाही, असं प्रणव परब म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com