Kala Academy Inauguration Ceremony Dainik Gomantak
गोवा

Kala Academy Inauguration: अखेर कला अकादमीच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! मंत्री गोविंद गावडेंनी दिली महत्वाची माहिती

बऱ्याच कालावधीपासून रखडलेला कला अकादमीच्या उद्घाटनाचा प्रश्न अखेर सुटण्याच्या वाटेवर आहे.

Kavya Powar

Kala Academy Inauguration Ceremony: बऱ्याच कालावधीपासून रखडलेला कला अकादमीच्या उद्घाटनाचा प्रश्न अखेर सुटण्याच्या वाटेवर आहे. कला आणि सांस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 10 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कला अकादमीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

कला अकादमीच्या खुल्या मंचावरील स्लॅब जुलै 2023 मध्ये कोसळला, तरी नूतनीकरणाचे काम 15 ऑक्टोबरला पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते.

परंतु काम पूर्णतेची दिलेली मुदत संपल्याने आता हे काम नोव्हेंबर 2023 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवापूर्वी (इफ्फी) पूर्ण होईल आणि अकादमी इफ्फीसाठी सज्ज होईल, असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

मंत्री गावडे यांनी इफ्फीपूर्वी अकादमी खुली होणार असल्याचे सांगितल्याने यावर्षी इफ्फीचे चित्रपट अकादमीत दाखविले जातील, असे स्पष्ट दिसत आहे. अकादमीतील सर्वात जास्त बैठक व्यवस्था असलेला सभागृह चित्रपट दाखविण्यास मिळत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT