Kadamba Employees: Dainik Gomantak
गोवा

Kadamba Employees: कदंबच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर स्थगित

Kadamba Employees: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संघटनेचा निर्णय

दैनिक गोमन्तक

Kadamba Employees:

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर केटीसी युनियनने आझाद मैदानावर महिनाभर सुरू केलेले आंदोलन शनिवारी सकाळी स्थगित केले.

शुक्रवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी युनियनला सोमवारी, 11 मार्चला कदंब नवीन बसेसची खरेदी आणि 7 व्या वेतनाच्या अंमलबजावणीसह इतर किरकोळ मागण्या पूर्ण करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले आहे.

गेला महिनाभर भर उन्हात आझाद मैदानात बसून धरणे आंदोलन करणाऱ्या कदंब युनियनच्या सदस्यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या आंदोलनाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले.

यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कदंब युनियनचे म्होरके ॲड. सुहास नाईक यांनी नमूद केले, की कदंब महामंडळाचे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या होत्या. त्यात नवीन बसगाड्या खरेदी करणे, थकबाकी देणे, सातव्या वेतन आयोगाचे वेतन लागू करणे,

रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना नियमित करणे आणि इतर काही मागण्या होत्या. या सर्व मागण्यांपैकी काही महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आणि इतर मागण्यांची दखल घेण्याचे आश्वासन दिल्याने आम्ही हे धरणे आंदोलन स्थगित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

SCROLL FOR NEXT