kadamba plateau bypass accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : कदंब पठारावरील बायपास रस्त्यावर दुचाकी व कारमध्ये अपघात

या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

Rajat Sawant

kadamba plateau bypass accident : कदंब पठार महामार्गावर दुचाकी व कारमध्ये आज अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कदंब पठारावरील बायपास रस्त्यावर साईबाबा मंदिरानजीक दुचाकी व कारमध्ये धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक व अन्य एक असे दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

कारला दुचाकीने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तर कारच्या मागील भागाचे नुकसान झाले आहे.

कदंब पठारावरील राष्ट्रीय महामार्ग हा सहापदरी झाल्यापासून तेथून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्ग रुंद तसेच खड्डेमुक्त असल्याने वाहनांची गती बेफाम असते. वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्‍वारांना मात्र जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.

तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळ्या लेन दिल्या आहेत. मात्र, वाहनचालक लेनची शिस्त पाळत नसल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT