Rohit Phalgaokar Dainik Gomantak
गोवा

Kadamba Dynasty: कदंब राजवटीत गोवा कुवेत, झंझिबार इत्यादी देशांमध्ये वस्तू निर्यात करत होता, डॉ. फळगावकरांनी उलगडला इतिहास

Rohit Phalgaokar: इतिहासकारांनी कदंब राजवटीची विभागणी दोन कालखंडात केलेली आहे. म्हणजे सुरुवातीचे कदंब आणि नंतरचे कदंब.

Sameer Panditrao

पर्वरी: ‘कदंब’ राजवटीत गोवा नारळ तेलाचे उत्पादन करत होता आणि कुवेत, झंझिबार इत्यादी देशांमध्ये मसाले आणि इतर वस्तू निर्यात करत होता, अशी माहिती डॉ. रोहित फळगावकर यांनी दिली.

मिथिक सोसायटी बंगळुरू यांनी कदंब राजवटीवर आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य महाविद्यालय, विर्नोडा येथील इतिहास विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रोहित फळगावकर यांनी कदंबाची कला आणि स्थापत्य या विषयावर संशोधनात्मक मांडणी केली.

या मांडणीत कंदब राजवटीतील कला आणि स्थापत्याचे अनेक वेगळे कंगोरे डॉ. रोहित फळगावकर यांनी उलगडून दाखविले. इतिहासकारांनी कदंब राजवटीची विभागणी दोन कालखंडात केलेली आहे. म्हणजे सुरुवातीचे कदंब आणि नंतरचे कदंब.

७ व्या शतकानंतर आलेल्या कदंबांनी हानगल आणि गोव्यावर राज्य केले. म्हणून इतिहासकार त्यांना हानगल कदंब आणि गोवा कदंब असे म्हणतात, असेही डॉ. रोहित फळगावकर यांनी सांगितले.

गोव्यात सुरुवातीच्या कदंबांचे पुरावे खूप कमी आहेत. खूप कमी शिलालेख उपलब्ध असल्यामुळे गोव्यात प्राचीन इतिहासाची मांडणी करताना मोठ्या अडचणी येतात. लिपीनुसार सर्वांत जुने शिलालेख ६ व्या शतकातील आहेत, अशी मांडणी डॉ. रोहित फळगावकर यांनी केली.

कदंब राजवटीने गोव्यावर जवळजवळ ३०० वर्षे राज्य केले. त्यांच्या शिलालेखावरून हे स्पष्ट होते की कदंब राजांनी स्थानिक प्रशासनात हस्तक्षेप केला नाही. खाजन जमीन, शेती, नारळाची बाग, सुपारी लागवड यांना प्रोत्साहन दिले, असे डॉ. रोहित फळगावकर यांनी सांगितले.

लेख आंतरराष्ट्रीय नियतकालिकात

आंतरराष्ट्रीय नियतकालिकात मेमरी, हिस्ट्री अ‍ॅण्ड कल्चर इन मेडिव्हियल साउथ एशिया हे स्प्रिंगरचे आंतरराष्ट्रीय प्रकाशन आहे. ज्यामध्ये डॉ. रोहित फळगावकर यांचा द कदंब्स ऑफ वेस्ट कोस्ट, अ सोशियो-कल्चरल आउटलुक यावरील संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाला. डॉ. रोहित फळगावकर यांनी प्रथमच कदंबकालीन इतिहास, समाज आणि संस्कृती व धर्मव्यवस्था उलगडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानसिक रुग्णांना मिळणार 'नवी उमेद'; IPHB मध्ये लवकरच सुरू होणार पुनर्वसन केंद्र

Gold Price Hike: शेअर बाजार पडला, पण सोन्याने घेतली उसळी, एका महिन्यात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ; आता सप्टेंबरमध्ये होणार नवा रेकॉर्ड?

Duleep Trophy 2025: 13 चौकार, 3 षटकार! आयुष बडोनीचा 'डबल धमाका'; द्विशतक ठोकून टीमला पोहोचवले उपांत्य फेरीत

Viral Video: चिमुकल्याला पाठीवर बसवून डॉल्फिनची 'जलसफर'! हृदयस्पर्शी व्हिडीओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Black Money Act: ‘ब्लॅक मनी’ कायद्यात मोठा बदल! ‘या’ लोकांसाठी दंड आणि शिक्षेचा धोका संपला; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT